हेलिकॉप्टर दुर्घटना : CDS रावत यांच्या जाण्यानं अपरिमित हानी - राजनाथ सिंह

हेलिकॉप्टर दुर्घटना : CDS रावत यांच्या जाण्यानं अपरिमित हानी - राजनाथ सिंह
Summary

सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat) प्रवास करत असलेलं हेलिकॉप्टर क्रॅश(Helicopter Crash) झालं आहे. बिपीन रावत यांच्यासह १४ जण या हेलिकॉप्टरमध्ये होते.

बंगळुरु - भारताचे सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झालं. तामिळनाडुत ही दुर्घटना घडली. तामिळनाडूतल्या कुन्नूर परिसरात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. सीडीएस बिपीन रावत यांच्यासह पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि आयएएफ पायलट यांच्यासह एकूण 14 लोक हेलिकॉप्टरमध्ये होते. सीडीएस बिपिन रावत यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू झाला आहे. (CDS Bipin Rawat Helicopter crash in Tamilnadu)

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हेलिकॉप्टर दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. देशाची अपरिमित अशी हानी झाल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

अपघातग्रस्त विमानाचा पायलट म्हणून विंग कमांडर पृथ्वी सिंग चौहान कार्यरत होते. ते १०९ हेलिकॉप्टर युनिटचे कमांडिग ऑफिसर असल्याची माहिती मिळत आहे.

हेलिकॉप्टर दुर्घटना; १४ पैकी १३ जणांचा मृत्यू

हेलिकॉप्टर दुर्घटनेत १४ पैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली आहे. यासंदर्भात राजनाथ सिंह सविस्तर माहिती उद्या संसदेत देतील असेही समजते.

राज्यसभेचं कामकाज उद्या म्हणजेच ९ डिसेंबर २०२१ पर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.

तामिळनाडुचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन हे घटनास्थळी जाणार आहेत. तसंच स्थानिक प्रशासनाला यासंदर्भात सूचना दिल्या असून आवश्यक ती मदत घटनास्थळी पोहोचवली जात आहेत.

राष्ट्रपतींचा कार्यक्रम रद्द

महाराष्ट्रात राजभवन येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या दरबार हॉल चे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांच्या हस्ते होणार होते. मात्र तामिळनाडू येथे हेलिकॉप्टर दुर्घटना झाल्याने त्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. याबाबतची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली आहे.

सीडीएस बिपिन रावत यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पोहोचले होते. त्यानंतर राजनाथ सिंह लोकसभेत बोलणार आहेत. दरम्यान, तामिळनाडुचे वनमंत्री के रामचंद्रन यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जणांचा मृत्यू झाला असून २ गंभीर असल्याची माहिती दिली आहे.

हेलिकॉप्टर दुर्घटना : CDS रावत यांच्या जाण्यानं अपरिमित हानी - राजनाथ सिंह
Chopper Crash : संरक्षण मंत्री लोकसभेत करणार निवेदन
हेलिकॉप्टर दुर्घटना : CDS रावत यांच्या जाण्यानं अपरिमित हानी - राजनाथ सिंह
हेलिकॉप्टर दुर्घटना : बिपीन रावत यांच्यासोबत कोण प्रवास करत होते?

सीडीएस बिपन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत. या हेलिकॉप्टरमधून रावत यांच्या पत्नीसह लष्कराचे वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. तसंच हेलिकॉप्टरला लागलेली आग आटोक्यात आणण्याचं काम सुरु आहे. (Bipin Rawat Chopper Crashes in Tamil Nadu)

हेलिकॉप्टर दुर्घटना : CDS रावत यांच्या जाण्यानं अपरिमित हानी - राजनाथ सिंह
अपघात एवढा भीषण होता की...; हेलिकॉप्टर क्रॅश फोटो व्हायरल
हेलिकॉप्टर दुर्घटना : CDS रावत यांच्या जाण्यानं अपरिमित हानी - राजनाथ सिंह
CDS रावत बिपिन यांच्या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये

लष्कराचं हेलिकॉप्टर कून्नूर इथं क्रॅश झालं आहे. यात जिवितहानीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत हे हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्यांमध्ये होते असं म्हटलं जात आहे. हवामानामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिपिन रावत यांच्या पत्नीसुद्धा या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होत्या अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com