Gram Panchayat Election Results : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची जोरदार मुसंडी; महायुतीची वाढली ताकद, 'महाविकास'ला फुटीचा फटका

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने मुसंडी मारल्याचे चित्र आहे.
Gram Panchayat Election Results
Gram Panchayat Election Resultsesakal
Updated on
Summary

सातारा तालुक्यात दोन ग्रामपंचायतीमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाचा विजय झाला आहे.

सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Election Results) स्थानिक आमदारांच्या गटानेच प्रमुख मोठ्या ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने मुसंडी मारल्याचे चित्र आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाला ४१ तर भाजपला ५९, शिंदे गट शिवसेनेला २७ ग्रामपंचायतीत सत्ता मिळाल्याचा दावा केला आहे.

तर महाविकास आघाडीतील शरद पवार गट राष्ट्रवादीला १७, काँग्रेसला (Congress) चार तर उद्धव ठाकरे शिवसेनेला सहा जागा मिळाल्या आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी व शिवसेनेला फुटीचा फटका बसल्याचे चित्र आहे.

Gram Panchayat Election Results
Murugesh Nirani : काँग्रेस सरकार कधीही पडू शकतं, 50 आमदार भाजपच्या संपर्कात; माजी मंत्र्याच्या दाव्याने खळबळ

जिल्ह्यातील १३१ ग्रामपंचायतींची निवडणूक होती. त्यापैकी ६८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या, तर सरपंचपदाचे ३७ उमेदवार बिनविरोध निवडून आले. उर्वरित ६४ ग्रामपंचायतींसाठी तर सरपंचपदाच्या १४ जागांसाठी मतदान झाले होते. आज झालेल्या निकालात जिल्ह्यात आमदारांच्या स्थानिक गटांनी ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखले आहेत. त्यातूनच राष्ट्रवादीच्या दुफळीचा फायदा उठवत भाजपने ग्रामपंचायतीत मुसंडी मारल्याचे चित्र आहे.

सातारा व जावळी तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी झालेल्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने बाजी मारली. जावळी तालुक्यातील २४ पैकी १८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, त्या सर्व ग्रामपंचायती शिवेंद्रसिंहराजेंच्या विचाराच्या आहेत. कुरळोशी, वाघदरे, भामघर (सरपंच), सांगवी (सदस्य-१), बिभवी, आनेवाडी ग्रामपंचायतींवर शिवेंद्रसिंहराजे गटाने बाजी मारली. सातारा तालुक्यातील पोटनिवडणूक झालेल्या कोंडवे (सदस्य- १), पांगारे (सदस्य- १), कोंढवली (सदस्य- १) येथे शिवेंद्रसिंहराजे गटाचा उमेदवार विजयी झाला. तर धावडशी, कारी, लुमाणेखोल, नित्रळ, वडगाव, अंबवडे या ग्रामपंचायतींवरही शिवेंद्रसिंहराजेंच्या गटाने सत्ता मिळवली.

Gram Panchayat Election Results
Bhogavati Factory Election : 'भोगावती'साठी चुरस वाढली; बिनविरोधची चर्चा सुरु असतानाच ताकद आजमावण्याचे छुपे प्रयत्न, कोण मारणार बाजी?

कऱ्हाड तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या निकालात कऱ्हाड उत्तरमधील आठही ग्रामपंचायतींत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे, तर कऱ्हाड दक्षिणमधील तीन ग्रामपंचायतींत काँग्रेसने आणि एका ग्रामपंचायतीत भाजपने यश मिळवले आहे. बानुगडेवाडीत १५ वर्षांनंतर सत्तांतर झाले. पाटण तालुक्यात पालकमंत्री शंभूराज देसाई गटाकडे २०, तर चार ग्रामपंचायती पाटणकर गटाकडे, काँग्रेसकडे एक आणि एक अपक्ष असे बलाबल आहे. कऱ्हाड तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी आठ, काँग्रेस तीन तर एक ठिकाणी भाजप विजयी झाले आहे.

वाई तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीपैकी आमदार मकरंद पाटील यांच्या नऊ ठिकाणी विजयी, तर सर्वपक्षीय दोन ठिकाणी विजयी झाले आहेत. माण तालुक्यात चार ग्रामपंचायतींपैकी एक बिनविरोध तर एक राष्ट्रवादी, एक भाजप व एक ठिकाणी भाजप-शिवसेना विजयी झाले आहे. सातारा तालुक्यात दोन ग्रामपंचायतीमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाचा विजय झाला आहे. कोरेगाव तालुक्यात पाच ग्रामपंचायतींपैकी तीन ठिकाणी आमदार महेश शिंदे व दोन शशिकांत शिंदे समर्थक विजयी झाले. जावळी तालुक्यातील पाचपैकी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाच्या चार ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे.

फलटण तालुक्यात माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर गटाला दोन, तर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर गटाने दोन ग्रामपंचायतींत विजय मिळवला आहे. दऱ्याचीवाडी ग्रामपंचायत राजे गटाने खासदार गटाकडून तर उपळवे ग्रामपंचायत राजे गटाकडून खासदार गटाने खेचून आणली आहे. उपळवे येथील एक उमेदवार अवघ्या एका मताने तर सावंतवाडी येथील एक महिला उमेदवार चिठ्ठीद्वारे विजयी घोषित करण्यात आली आहे. खटाव तालुक्यात तिन्ही ग्रामपंचायतींत आमदार महेश शिंदे समर्थक गटाचा विजय झाला आहे. वाई तालुक्यात ११ पैकी ग्रामपंचायतींपैकी शहाबाग व वेळे येथे परिवर्तन झाले.

Gram Panchayat Election Results
Raju Shetti : 'दत्त इंडिया' सांगलीत पैसे मिळवण्यासाठीच आलंय; राजू शेट्टींचा गंभीर आरोप, मराठा आरक्षणावरही केलं भाष्य

याठिकाणी भाजप, शिवसेना, आरपीआय व स्थानिक गट अशा सर्वपक्षीय आघाडीने बाजी मारली. पाचवडमध्ये राष्ट्रवादीने सत्ता कायम राखली. मात्र, बहुमत सर्वपक्षीय आघाडीकडे राहिले. चांदवडीत परिवर्तन होऊन राष्ट्रवादीची सत्ता आली, तर यशवंतनगर, खडकी, चिंधवली, अमृतवाडी, कुसगाव, विठ्ठलवाडी, ओहळी येथे आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. एकूण नऊ ग्रामपंचायती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. माण तालुक्यात भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गटाने पाच ग्रामपंचायतींवर बाजी मारली असून, राष्ट्रवादीला एकच ग्रामपंचायत मिळाल्याने माण तालुक्यात पुन्हा एकदा ‘जय हो’चा नारा घुमला आहे.

सत्रेवाडीची निवडणूक बिनविरोध झाली होती. ती भाजपच्या विचारांची असून, नुकत्याच झालेल्या पाच ग्रामपंचायतींत पांगरी, दिडवाघवाडी, दोरगेवाडी, बिजवडी याठिकाणी भाजपने वर्चस्व मिळवले आहे. बिजवडीत भाजपने स्थानिक पातळीवर शिवसेनेशी युती करत जनविकास आघाडी पॅनेल टाकले होते, तर जाधववाडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला खाते उघडता आले आहे.

पाटण तालुक्यात आठ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले. मल्हारपेठ, मुंद्रुळकोळे, कुसरुंड, बेलवडे खुर्द, गावडेवाडी, जिंती ग्रामपंचायतींमध्ये देसाई गटाने सत्तांतर घडवून आणले, तर रुवले ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि गाढखोपमध्ये महाविकास आघाडीने मंत्री शंभूराज देसाई यांच्या पॅनेलचा पराभव केला. आठ ग्रामपंचायतींची मंत्री देसाई यांनी तर दोन ग्रामपंचायतींत राष्ट्रवादी काँग्रेसने आणि मुंद्रुळकोळे खुर्द ग्रामपंचायतीत राष्ट्रीय काँग्रेसने सत्ता अबाधित राखली. मंत्री शंभूराज देसाई गटाची १८ ग्रामपंचायतीत सत्ता आली आहे. पाटणकर गटाकडे चार, काँग्रेसकडे एक ग्रामपंचायत मिळाली आहे.

Gram Panchayat Election Results
Maratha Reservation : OBC मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नका, त्यांना स्वतंत्र..; काय म्हणाले रामदास कदम?

परिवर्तन झालेल्या ग्रामपंचायती

आनेवाडी, वेळे, शहाबाग, तडवळे, बानुगडेवाडी, बिभवी, कुसरुंड, तडवळे (सं.), मल्हारपेठ, मुंद्रुळकोळे, कुसरुंड, बेलवडे खुर्द, गावडेवाडी, जिंती.

यांचे वर्चस्व ...

  • पाटण : पालकमंत्री

  • माण : जयकुमार गोरे

  • वाई, महाबळेश्‍वर : मकरंद आबा

  • सातारा, जावळी : शिवेंद्रसिंहराजे

  • कऱ्हाड उत्तर : बाळासाहेब

  • कऱ्हाड दक्षिण : पृथ्वीराज बाबा

  • कोरेगाव, खटाव : महेश शिंदे

  • फलटण : रामराजे, रणजितसिंह निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur ZP Solar Projects
Legal Action Against Fake Caste Certificates In Maval Raises Questions For Reserved Seats Ahead Of Gram Panchayat Polls
Social activist Sachin Chavan withdrew his indefinite hunger strike after the administration assured in writing that the alleged financial irregularities in Adul Gram Panchayat would be investigated and a report submitted within 15 days
Social activist Sachin Chavan has launched an indefinite hunger strike outside the Adul Gram Panchayat office in Paithan taluka, demanding an impartial inquiry into alleged financial irregularities and action against those found responsible.
Marathi News Esakal
www.esakal.com