काळभैरवनाथ युवा पॅनेलचा अल्प मताने पराभव; निकालावर आक्षेप

प्रशांत घाडगे
Tuesday, 19 January 2021

या निकालावर काळभैरवनाथ युवा पॅनेलने आक्षेप घेत या प्रकाराबाबत तहसीलदार आशा होळकर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. 

सातारा : माजगाव (ता. सातारा) ग्रामपंचायत निवडणूक निकालावर काळभैरवनाथ युवा पॅनेलने आक्षेप घेतला आहे. दरम्यान, या निकालाबाबत काळभैरवनाथ युवा पॅनेल निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
माजगाव येथे सात जागांवर निवडणूक झाली होती. निकालानंतर काळभैरवनाथ युवा पॅनेलचे तीन उमेदवार, तर भैरवनाथ ग्रामविकासचे चार उमेदवार विजयी झाले. मात्र, या निवडणुकीवर आणि निकालावर काळभैरवनाथ युवा पॅनेलने आक्षेप घेतला आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले, की पाच मतदार माजगावचे रहिवासी नसून मत्यापूरचे रहिवासी असताना वॉर्ड क्रमांक एकमध्ये त्यांनी मतदान केले. मतदानावेळी त्यांना मतदान करून देऊ नये, असा आक्षेप घेऊन काळभैरवनाथ पॅनेलने संबंधित मतदारांना रोखले होते. त्या वेळी तणाव निर्माण झाला होता. मात्र, मतदार यादीत त्यांचे नाव असल्यामुळे त्यांना मतदान करून देण्यात आले. याची लेखी तक्रार नंतर करण्यात आली होती.

मुंबई, पुणे, काेल्हापूरहून साता-याला येताय! त्यापुर्वी हे वाचा

दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर वॉर्ड क्रमांक एकमध्ये काळभैरवनाथ पॅनेलचे एक उमेदवार दोन मताने, तर दुसऱ्या उमेदवाराचा पाच मतांनी पराभव झाला. त्यामुळे मतमोजणीवेळी आक्षेप घेण्यात आला. या वेळी पुन्हा तक्रार करण्यात आली असून, या निकालावर काळभैरवनाथ युवा पॅनेलने आक्षेप घेत या प्रकाराबाबत तहसीलदार आशा होळकर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. 

महाबळेश्‍वरात पहिल्यांदाच दिसले पांढऱ्या रंगाचे शेकरू

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat Election Results Satara Trending Marathi News