Gram Panchayat Results : क-हाड, फलटणला उमेदवारांचा आनंद पारावार; चिठ्ठीने जिंकविले

Gram Panchayat Results : क-हाड, फलटणला उमेदवारांचा आनंद पारावार; चिठ्ठीने जिंकविले

कराड :  सातारा जिल्ह्यातील 878 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. या निवडणुकीत 123 ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध, तर 98 ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात 654 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य ता. 15 जानेवारीला मतपेटीत बंद झाले हाेते. आज (साेमवार) मतमाेजणीस प्रारंभ झाला. 

हजारमाची येथील ग्रामपंचायत निवडणुकीत एका जागेवर दाेन्ही उमेदवारांना समान मते मिळाली. त्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी एका बालिकेच्या हस्ते चिठ्ठी काढण्याचा निर्णय घेत हा पेचप्रसंग सोडविला. बालिकेने काढलेले चिठ्ठीत श्री जानाई देवी पॅनलच्या सीता माने यांचे नाव निघाले. त्यानूसार निवडणुक निर्णय अधिकारी यांनी सिता माने यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे चिठ्ठीद्वारे सिता माने यांचा विजय झाला. 

जालन्यातील अपहरणकर्त्याची साताऱ्यात सुटका; काेल्हापूर, सांगली, साेलापूरच्या युवकांना अटक

हजारमाची येथे ज्योतिर्लिंग पॅनेल व जानाई देवी यांच्या झालेल्या लढतीत वाॅर्ड क्रमांक दोनमध्ये खुल्या गटासाठी लढत झाली. खुल्या गटात सीता माने व संगीता माने यांना समान 359 मते मिळाली होती. समान मतामुळे निकाल लागलेला होता. तेव्हा लहान बालिकेच्या हाताने चिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये जानाई देवी पॅनेलच्या सीता माने यांचे नाव निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.


कोळकीत भाजप धाेबी पछाड

फलटण शहर : कोळकी ग्रामपंचायतीवर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर गटाचे वर्चस्व दिसून आले आहे. या ठिकाणी भाजप पुरस्कृत पॅनेलचा धाेबी पछाड झालेला आहे. राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार व संजीवराजे नाईक - निंबाळकर यांचे निकटचे सहकारी तुषार नाईक निंबाळकर यांचा मात्र येथे पराभव झालेला आहे.

या ग्रामपंचायतीमधील प्रभाग क्रमांक चार येथून प्राजक्ता सागर काकडे यांचा चिठ्ठीद्वारे विजय झालेला आहे. दरम्यान प्रभाग क्र. १, २ व ६ मधून राजे गटांतर्गत बंडखोरी केलेले चारही उमेदवार विजयी झाले आहेत.

Gram Panchayat Results : महेश शिंदेंनी चाखली शशिकांत शिंदेंच्या गावात विजयाची ‘हॅट्‌ट्रिक’


वाठार किरोली (ता. कोरेगाव) ग्रामपंचायतीत जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री आंबामाता ग्रामविकास पॅनेलने १३ पैकी १० जागा मिळवत ग्रामपंचायतीची सत्ता हस्तगत केली. विरोधी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संभाजीराव गायकवाड, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष लक्ष्मी गायकवाड, तसेच विकास गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील श्री अंबामाता जनशक्ती पॅनलला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले.

Gram Panchayat Results : बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज चव्हाण, (कै.) उंडाळकर, अतुल भाेसले गटाचे वर्चस्व

कुडाळ ग्रामपंचायत निवडणूकीत सर्व 15 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. रयत पॅनेलला सर्वाधिक 7 जागा, समर्थ पॅनेलला 4 जागा तर बहुजन विकास आघाडीला 4 जागा मिळाल्या आहेत. सध्यचा परिस्थितीत बहुमताचा आठ हा आकडा कोणत्याही पॅनेलला गाठता आला नाही. त्यामुळे आजच्या घडीला त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच खऱ्या राजकीयय घडामोडी घडतील व सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल, असे प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहेत.

कोपर्डे हवेलीत राष्ट्रवादीची सत्ता कायम. सत्ताधारी राष्ट्रवादी गटाचे ८ उमेदवार तर विरोधी काॅंग्रेस गटाचे ७ उमेदवार विजयी.

कुकुडवाड राष्ट्रवादीच्या संजय जाधव यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब
10-3 विजयी. जाधव पती-पत्नी सलग चौथ्यांदा विजयी.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com