Gram Panchayat Results : पवारवाडीत पवारांचा बालेकिल्ला ढासळला; 40 वर्षांनंतर सत्तांतर

Satara Latest Marathi News Satara Politics News
Satara Latest Marathi News Satara Politics News

सायगाव (जि. सातारा) : जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांचा बालेकिल्ला असणाऱ्या पवारवाडीत तब्बल 40 वर्षांनी सत्तांतर करत किनाळी देवी ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने 5 विरुद्ध 2 असा विजय मिळवून किनाळी देवी ग्रामविकास आघाडीचा पराभव करत इतिहास घडविला. 

संघर्षमय अशा अटीतटीच्या निवडणुकीत किनाळी देवी परिवर्तन पॅनेलच्या संजय पवार, सोन्या पवार, जितेंद्र जाधव, दिलीप वारागडे, सदाशिव घाडगे यांच्यासह तरुण वर्ग एकत्र येऊन दीपक पवारप्रणीत किनाळी देवी ग्रामविकास आघाडी पॅनेलच्या तानाजी पवार, संजय पवार, धनाजी पवार यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करत ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली होती. या गटाने अगोदरच दोन जागा बिनविरोध घेतल्याने सत्ता सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात राहील, अशी चिन्ह होती. मात्र, 5 जागांवर मोठ्या फरकाने विजय मिळवित 40 वर्षांची सत्तांतर घडवले.

विजयी उमेदवार (कंसात मिळालेली मते) : वॉर्ड क्रमांक 1- लक्ष्मण गणपती घाडगे (133), अश्विनी संतोष जाधव (127), सुभद्रा दादासो पवार (136), तुकाराम निवृत्ती भिलारे (125), सुरेखा नवनाथ वारागडे (127). सत्ताधारी गटाचे प्रभाकर पांडुरंग तोडकर, लीलावती प्रभाकर तोडकर हे बिनविरोध निवडून आले. या विजयामध्ये सुनील शिंदे, उमेश पवार, अरुण ढवळे, संतोष जाधव, रमेश मोरे, पोपट वारागडे, प्रवीण जाधव, राहुल वारागडे, जीवन पवार, संजय शिवराम पवार, सुनील पवार, विठ्ठल घाडगे, नरेश घाडगे यांनी मोलाचे योगदान दिले.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, माजी सभापती सुहास गिरी, सभापती जयश्री गिरी, माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. जनतेने आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही गावचा सर्वांगीण विकास करून सार्थ ठरवू, नवनिर्वाचित सदस्य लक्ष्मण घाडगे यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com