ग्रामपंचायत निवडणुक : नेचल, मेंढेघरसह हुंबरळीत देसाई-पाटणकर गटात लढत

ग्रामपंचायत निवडणुक : नेचल, मेंढेघरसह हुंबरळीत देसाई-पाटणकर गटात लढत

कोयनानगर (जि. सातारा) : ग्रामपंचायतींच्या निवडणुकामध्ये कोयना विभागातील सात ग्रामपंचायती आहेत. त्यात कामरगाव ग्रामपंचायतीत देसाई व पाटणकर गटांत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दोन्ही शेलारांनी आघाडी करून ग्रामपंचायत बिनविरोध केली. अन्य दोन ग्रामपंचायतीही बिनविरोध झाल्या. मात्र, हुंबरळी ग्रामपंचायतीमध्ये दोन्ही गट आमनेसामने आहेत. त्यामुळे वातावरण गरम आहे.
 
कोयना विभागातील कामरगाव, हुंबरळी, नानेल, गोषटवाडी, वांझोळे, नेचल, मेंढेघर या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. त्यातील नानेल ग्रामपंचायत वगळता उर्वरित ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. विरोधात शिवसेना आहे. मेंढेघर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच शिवसेनेचे असले तरी बहुमत राष्ट्रवादीचे आहे. विभागाच्या राजकारणातील देसाई व पाटणकर गटाचे दोन शेलार आहेत. त्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार व पंचायत समितीचे सभापती राष्ट्रवादीचे राजाभाऊ शेलार यांनी आपल्या कामरगाव ग्रामपंचायत निवडणुकीकडे निवडणूक वेगळ्या वळणावर आणली आहे. या ग्रामपंचायतीमध्येही आघाडी अस्तित्वात आली. प्रथम अडीच वर्षे सरपंचपदाचा फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्‍यता आहे.

पृथ्वीराज चव्हाण-विलासराव पाटील उंडाळकरांचे मनोमिलन यशस्वी; अपक्षांचे आव्हान 

या ग्रामपंचायतीचा आदर्श विभागातील गोषटवाडी व वांझोळे या दोन ग्रामपंचायतींनी घेतला आहे. ग्रामपंचायत बिनविरोध करण्यावर दोन्ही गटांत एकमत झाल्यामुळे पहिल्यांदा गोषटवाडी ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे दोन सदस्य दिसणार आहेत. गोषटवाडी व वांझोळे ग्रामपंचायतीवर पाटणकर गटाची सत्ता कायम असणार आहे, तर कामरगाव ग्रामपंचायतीवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. नानेल ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे तीन सदस्य बिनविरोध निवडून आले असून चार जागांसाठी शिवसेना व राष्ट्रवादीत निवडणूक होत आहे. 

अकरा वर्ष झाली कऱ्हाड पालिकेचा पोलिसांच्या पत्रावर निर्णयच नाही 
 
देसाई व पाटणकर गट आमनेसामने 

या विभागात बिनविरोधचा फॉर्मुला जोरात चालला असला तरी नेचल, मेंढेघर व हुंबरळी ग्रामपंचायतींमध्ये पारंपरिक स्पर्धक असलेले देसाई व पाटणकर गट आमनेसामने आले आहेत. दोन्ही गटांनी या ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेण्यासाठी जोर लावला आहे. नेचल, मेंढेघर, हुंबरळी व नानेल ग्रामपंचायतींवर कोण बाजी मारणार, यावर पुढील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचा रंग ठरणार आहे.

नायलॉन मांजामुळे महिलेचा मृत्यू 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com