esakal | सातारा जिल्ह्यातील 'या' ग्रामपंचायतीने जाहीर केला तीन दिवसांचा लॉकडाउन

बोलून बातमी शोधा

सातारा जिल्ह्यातील 'या' ग्रामपंचायतीने जाहीर केला तीन दिवसांचा लॉकडाउन

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मलवडीची श्री खंडोबाची यात्रा भरविण्यास व रथाची मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे अशी माहिती प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी दिली.

सातारा जिल्ह्यातील 'या' ग्रामपंचायतीने जाहीर केला तीन दिवसांचा लॉकडाउन
sakal_logo
By
रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : मलवडी येथील श्री खंडोबाचा उद्या (शुक्रवार) होणारा रथोत्सव रद्द करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 25, 26 व 27 डिसेंबर रोजी संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. या काळात कोणीही मलवडीत येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. 

श्री खंडोबाची यात्रा प्राचीन व गाजलेली आहे. श्री खंडोबा व श्री महालक्ष्मीच्या रथांची ग्रामप्रदक्षिणा काढण्यात येते. यात्रेस रथोत्सवादिवशी लाखो भाविकांची उपस्थिती असते. सध्या प्रशासनाच्या निर्णयानुसार धार्मिक स्थळे उघडण्यास व धार्मिक कार्यक्रम करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, रथ मिरवणूक, पालखी सोहळे काढण्यास प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यंदा यात्रेतील धार्मिक कार्यक्रम मानकरी व पुजारी हे प्रशासनाच्या देखरेखीखाली करतील; पण रथाची मिरवणूक काढण्यात येणार नाही.

रेल्वेत नोकरीच्या अमिषाने मामा-भाच्याला १८ लाखांना गंडा

सध्या मलवडीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे मागील रविवारी मलवडीचा आठवडा बाजार भरवला नव्हता, तसेच यात्रा कालावधीत होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्रामपंचायत मलवडी व श्री मल्हारी म्हाळसाकांत देवस्थान ट्रस्ट यांनी 25, 26 व 27 डिसेंबर रोजी संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. या काळात मंदिरही दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात कोणीही मलवडीत येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

पक्षांतरबंदी उल्लंघनप्रकरणी भाजप नगरसेविकांचे भवितव्य आज साताऱ्यात ठरणार
 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मलवडीची श्री खंडोबाची यात्रा भरविण्यास व रथाची मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. 

- शैलेश सूर्यवंशी, प्रांताधिकारी 

Edited By : Siddharth Latkar