
कऱ्हाड : हलगी- घुमक्याचा निनाद, तुतारीचा गगनचुंबी स्वरनाद, झांजांचा घनघनाट, धनगरी ढोलाचा ठेका अन् नंदीच्या नावानं चांगभलंचा जयघोषात काले येथील ४०० वर्षांची परंपरा असलेली नंदी यात्रा आज गुलालाची उधळणीत भक्तिमय वातावरणात झाली. कालेचे आराध्य दैवत श्री नंदी देवाची यात्रेची आज सांगताही झाली. शिवकालीन चित्तथरारक कसरती पाहण्यासह दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.