

Granthdindi procession creating a vibrant literary and cultural atmosphere at the 99th Marathi Sahitya Sammelan in Satara.
sakal
सातारा : छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा), ता. १ : माजी संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनाने व ध्वजवंदनाने आज ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बिगूल वाजला. सायंकाळी शहरातून मोठ्या उत्साहात निघालेल्या ग्रंथदिंडीने ग्रंथ, विचार व वाचन संस्कृतीच्या जागराला दिमाखदार सुरुवात झाली. त्यामुळे राजधानी साताऱ्यातील वातावरण साहित्यमय झाले होते.