Satara News: हजारोंच्या उपस्थितीत साताऱ्यात शिवजागर; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते महाआरती, डोळे दिपवणारी फटाक्यांची आतषबाजी!

Cultural and spiritual Shivjagar program Highlights: शाही मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर, शिवभक्तांचा उत्साह
Minister Shivendrasinhraje Bhosale performing Maha Aarti during the grand Shivjagar celebration in Satara amid a massive gathering.

Minister Shivendrasinhraje Bhosale performing Maha Aarti during the grand Shivjagar celebration in Satara amid a massive gathering.

sakal

Updated on

सातारा: ढोल-ताशांचा गजर, तुतारीच्या वादनाने भारावलेले वातावरण अन् भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेल्या शिवभक्तांच्या उपस्थितीत येथे आज शाही मिरवणूक झाली. या मिरवणुकीत हत्ती, उंट, घोड्यांचा सहभाग, मावळ्यांच्या पारंपरिक वेशभूषा व उज्जैन येथील वैशिष्ट्यपूर्ण वांद्यामुळे मिरवणुकीला भव्‍यदिव्‍य स्वरूप आले. पोवई नाका येथे हजारोंच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते शिवरायांची महाआरती झाली. या वेळी उपस्थितांचे डोळे दिपवणारी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com