

MP Nitin Patil
Sakal
सातारारोड : दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जावे, अशी भावना जिल्ह्यातील कार्यकर्ते माझ्याजवळ व्यक्त करत आहेत. येणारी निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर ठेवून निश्चितपणे त्या पद्धतीने प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन खासदार नितीन पाटील यांनी केले.