
-जगन्नाथ माळी
उंडाळे: लग्नामध्ये उपस्थित नातलग, मित्रमंडळींना अक्षता न देता विविध झाडांच्या बियांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर त्या रुजविण्याचे आवाहन करत लग्न समारंभातूनच ‘झाडे लावा-झाडे जगवा’ असा संदेश देण्याचा स्तुत्य उपक्रम येथील पाटील कुटुंबीयांनी राबवला. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.