परतीचा तडाखा! सातारा जिल्ह्यात दीड हजार हेक्‍टर पिकांचे नुकसान

उमेश बांबरे
Friday, 16 October 2020

भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवसांत बहुतेक ठिकाणी विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्‍यता वर्तविली आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले आहे.

सातारा : ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे कृषी विभागाच्या प्राथमिक नजर अंदाजानुसार जिल्ह्यातील एक हजार 420 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे संबंधित विभागांनी तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा, अशी सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी येथे केली.
 
पालकमंत्री पाटील यांनी अंबवडे बुद्रुकमध्ये (ता. सातारा) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातपिकाची पाहणी केली. त्यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, तहसीलदार आशा होळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत उपस्थित होते.

लॉकडाऊननंतर महिलांच्या मद्यपानात घट, नशाबंदी मंडळाची माहिती

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक नजर अंदाजानुसार सातारा तालुक्‍यातील भात, सोयाबीन व भुईमूग- 60 हेक्‍टर, कोरेगाव तालुक्‍यातील सोयाबीन, भाजीपाला व आले- 120 हेक्‍टर, खटाव तालुक्‍यातील बटाटा, कांदा- 70 हेक्‍टर, कऱ्हाडमधील भात, ज्वारी- 20 हेक्‍टर, पाटण तालुक्‍यातील भात- 200 हेक्‍टर, खंडाळा तालुक्‍यातील भाजीपाला- 5 हेक्‍टर, वाई तालुक्‍यातील भात, सोयाबीन व भाजीपाला- 15 हेक्‍टर, महाबळेश्वर तालुक्‍यातील भात- 30 हेक्‍टर, फलटण तालुक्‍यातील भाजीपाला, मका व ज्वारी- 390 हेक्‍टर, माण तालुक्‍यातील ज्वारी व मका- 510 हेक्‍टर असे एकूण एक हजार 420 क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

चक्रीवादळाचा नेटीझन्सकडून धुरळा!

जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांतून सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास हा विसर्ग वाढण्याची शक्‍यता असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे तसेच भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवसांत बहुतेक ठिकाणी विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्‍यता वर्तविली आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले आहे. 

कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी नगराध्यक्षांचे कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार

अतिवृष्टीचा असा बसला तडाखा...
 

 •  कोयनेसह जिल्ह्यातील सर्व धरणांतून विसर्ग सुरूच
 •  
 •  कृष्णा, कोयना, उरमोडी नद्यांच्या पातळीत वाढ
 •  
 •  माणगंगा, बाणगंगा नद्यांना महापूर
 •  
 •  फलटणला दोन दिवसांत वर्षातील पावसाची नोंद
 •  
 •  म्हसवडला नदीकाठची खोकी, शेड वाहून गेली
 •  
 • वडूज, पुसेगावातील स्मशानभूमीचे नुकसान
 •  
 • गोंदवल्यातील बंधाऱ्याला भगदाड
 •  
 • पुणे-पंढरपूर मार्ग 13 तास बंद
 •  
 • फलटण, टाळगाव, ओगलेवाडीतील काही घरांत पाणी
 •  
 • कऱ्हाड-विटा मार्गावरील वाहतूक काही काळ बंद
 •  
 • कऱ्हाड-तासगाव रस्त्यावरील वाहतूक विस्कळित

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Balasaheb Patil Visited Farms After Heavy Rain Satara News