esakal | एका दिवसांत 31 हजार 505 नागरिकांनी घेतली लस; पालकमंत्र्याचा केंद्रावर दाैरा
sakal

बोलून बातमी शोधा

एका दिवसांत 31 हजार 505 नागरिकांनी घेतली लस; पालकमंत्र्याचा केंद्रावर दाैरा

लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले.

एका दिवसांत 31 हजार 505 नागरिकांनी घेतली लस; पालकमंत्र्याचा केंद्रावर दाैरा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची प्रक्रिया वेग घेत असून, दिवसेंदिवस लसीकरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी (ता. 12) एका दिवसात जिल्ह्यातील विविध केंद्रांवर 31 हजार 505 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून, ही लसीकरणातील आतापर्यंतची उच्चांकी आकडेवारी असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.
 
जिल्ह्यात सोमवारी 140 केंद्रांवर 28 हजार 509 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आरोग्य विभागाचे दररोज 21 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट्य असतानाही सर्वात जास्त 136 टक्के लसीकरण करण्यात आले होते. यामध्ये जावळी तालुक्‍यात एक हजार 571, कऱ्हाड सहा हजार 148, खंडाळा एक हजार 739, खटाव तीन हजार 540, कोरेगाव तीन हजार 73, महाबळेश्‍वर 945, माण 985, पाटण चार हजार 962, फलटण दोन हजार 638, सातारा चार हजार 538, वाई तालुक्‍यात एक हजार 368 असे जिल्ह्यात 31 हजार 505 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, तसेच नागरिकांनी कोरोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. गौडा यांनी केले आहे. 

पाटण तालुक्‍यात पाच गव्यांचा कळप विहिरीत कोसळला; धावडेत मुक्‍या प्राण्यांचे जीवन धोक्यात

दरम्यान उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण मोहिम चालु असून लसीकरण केंद्रास आज (मंगळवार) पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट दिली. यावेळी येथील डॉक्टर, नर्स तसेच लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केले. 

यावेळी डॉ. संजय कुंभार, डी.बी.जाधव, हंबीरराव जाधव, सोमनाथ जाधव, सरपंच योगराज जाधव, उपसरपंच सुनंदा जाधव, संग्रामसिंह पलंगे, अजित जाधव, प्रमोद पुजारी, सुधीर जाधव, सुधाकर जाधव, दिगंबर भिसे आदी उपस्थित होते.

बाजार कराच्या ठेक्‍यातही राजकारण; नवा ठेका आरोपांच्या पिंजऱ्यात अडकण्याची भीती!

Edited By : Siddharth Latkar