
कऱ्हाड : लोकसभा, विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकवूया. त्यासाठी पक्ष बळकटीसाठी सज्ज व्हा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. कऱ्हाड येथे शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा समन्वयक राजेंद्रसिंह यादव, शिवसेनेचे संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार, जिल्हा समन्वयक राजेंद्र यादव, चंद्रकांत जाधव, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, स्मिता हुलवान, सुलोचना पवार, रणजित भोसले आदी उपस्थित होते.