
सातारा : मॉन्सून कालावधीत जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून प्रत्यक्ष गावपातळीवर जाऊन काम करावे. अतिपावसामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांवर विशेष लक्ष द्यावे. पावसामुळे शेती पिकांचे, पशुधनाच्या नुकसानीचे पाऊस उघडताच गतीने पंचनामे करावेत. या पंचनाम्यातून एकही बाधित मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. जीआयएस सर्वेक्षण झालेल्या दरडप्रवण गावांच्या स्थलांतरासाठी शासकीय जमिनीचा शोध घ्यावा, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.