shambhuraj Desai
ढेबेवाडी : ‘‘देसाई गटात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कुणाला घाबरायचे कारण नाही. माझी सर्व ताकद तुमच्या पाठीशी आहे. कार्यकर्ता जर धाडसाने निर्णय घेत असेल, तर नेता म्हणून दहा पावले पुढे यायला मी तयार आहे. माझ्या कार्यकर्त्यांना कुणी डिवचण्याचा प्रयत्न केला, तर तुमचा करेक्ट कार्यक्रम झाला म्हणूनच समजा. माझ्याकडे असे इंजेक्शन आहे जे टोचल्यावर दुखत नाही, परिणाम झाल्यावरच कळतं,’ अशा शब्दात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी इशारा दिला.