इंडिया गेट ते गेटवे ऑफ इंडिया अंतर 29 दिवसांत पुर्ण करणा-या सुफियाची आज अजिंक्यता-याला गवसणी

इंडिया गेट ते गेटवे ऑफ इंडिया अंतर 29 दिवसांत पुर्ण करणा-या सुफियाची आज अजिंक्यता-याला गवसणी

सातारा : काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book Of Records) आपले नाव नोंदविणारी धावपटू सुफिया खानने आपल्या दिल्ली ते काेलकत्ता व पुन्हा दिल्ली या माेहिमे अंतर्गत आज सातारा गाठले. साता-यातील धावपटूंनी तिच्यासाेबत पुणे बंगळूर महामार्गावर धावून प्राेत्साहनपर शुभेच्छा दिल्या. सुफिया 87 दिवसांत गोल्डन चतुर्भुज पूर्ण करून नवीन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी प्रयत्नशिल राहिली आहे. अजमेर येथील 35 वर्षीय सुफिया आपले ध्येय गाठण्यासाठी परिश्रम घेत आहे. ८७ दिवसांत सुमारे सहा हजार किलाेमीटर धावण्याचा नवा विक्रम स्थापित करण्याच्या उद्देशाने ती मुख्य महामार्गावरुन धावत आहे. सध्या सहा हजार किलाेमीटर धावण्याचा विक्रम हा 135 दिवसांचा आहे. तिने आपला प्रवास दिल्लीच्या इंडिया गेटपासून 16 डिसेंबर 2020 दरम्यान सुरु केला. त्यानंतर ती मुंबईहून निघाली. तिथून चेन्नई, नंतर कोलकाता आणि नंतर परत दिल्लीला जाणार आहे.

गगन भरारी! जागतिक विक्रमासाठी साताऱ्यातील पाच बाल वैज्ञानिकांची निवड

गेल्या वर्षी काेराेनामुळे सर्व देशभर लाॅकडाऊनची परिस्थिती आल्याने सुफिया निराश झाली हाेती. खरं तर तिने तिचे उद्दीष्ट गाठण्यासाठी फेब्रुवारी २०२० मध्ये धावण्यास सुरुवात केली हाेती. परंतु ते (काेलकत्ता ते दिल्ली) विरुद्ध दिशेने . मार्च अखेरीस २,२०० किलाे मीटर पूर्ण झाल्यानंतर तिला आपला प्रवास थांबावा लागला. काेराेनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लॉकडाऊन जाहीर झाले. तिचे पती विकास जे स्वतः सायकलपटू (गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड) आहेत त्यांनीही पुन्हा दिल्लीकडे परत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ते आणि सुफिया त्रिवेंद्रमजवळील महामार्गावर होते. तथापि, पुन्हा परवानगी मिळताच सुफियाने आता धावण्यास प्रारंभ केला आहे.

आज ती सातारानजीकच्या पुणे बंगळूर महामार्गावर पाेचली. तेथे तिचे साता-यातील धावपटूंनी जाेरदार स्वागत केले. टाळ्यांच्या गजरातच सुफियासमवेत धावपटू धावू लागले. तिच्या माेहिमेस सर्वांनी शुभेच्छा दिल्या. आगामी काळात तिने साता-यात येऊन धावपटूंना मार्गदर्शन करावे असे आवाहनही केले.  

राजस्थानच्या अजमेरमध्ये राहणारी 33 वर्षीय धावपटू सुफिया खानच्या नावावर 87 दिवसात 4035 किलाे मीटर धावण्याचा विक्रम आहे. सुफियाने काश्मीर ते कन्याकुमारीचे अंतर 'मिशन होप' साठी 87 दिवस, दाेन तास आणि १७ मिनिटांत पूर्ण केले हाेते. देशातील २२ शहरांची भेट देऊन लोकांना भेटून बंधुता, ऐक्य, शांतता, समानतेचा संदेश देणे हे त्याचे उद्दीष्ट होते. यासाठी तिला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित केले आहे.

मिशन होप म्हणजे काय?

सुफियाच्या म्हणण्यानुसार, तिने देशातील लोकांपर्यंत मानवता, ऐक्य, शांतता आणि समानतेचा संदेश देण्यासाठी प्रवास सुरू केला. त्यांच्या ध्येय म्हणजे आशा, H - मानवता (Humanity), O - एकता (Oneness), P - शांती(Peace), E - समानता (Equity). 100 दिवसात शर्यत पूर्ण करण्याचे लक्ष्य होते परंतु हे लक्ष्य 87 दिवसात पूर्ण केले. ती सांगते की माझ्या मिशन 'मिशन होप' दरम्यान मी ज्या शहरांमध्ये गेलो होतो तिथे माझे स्वागत करण्यात आले. स्थानिकही माझ्याबरोबर धावले.

पत्नीशी भांडून आलेल्या पुण्यातील युवकाचा महाबळेश्वरच्या द-या खाे-यात शाेध सुरु

माझी कामगिरी अभियानात सामील असलेल्या प्रत्येक व्यक्तीला समर्पित आहे. सुफियाच्या मते, ज्यांनी तिला मिशनमध्ये पाठिंबा दर्शविला आणि कुटुंबाचा भाग बनला त्यांच्यासाठी ती कृतज्ञ आहे. ज्येष्ठ मंडळींनी माझी  मुलीसारखी काळजी घेतली. विशेषत: जेव्हा मी चालण्याच्या स्थितीत नव्हते तेव्हा लोकांनी देवदूतांप्रमाणे मला मदत केली. गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र मिळाल्यावर ती म्हणाली हाेती, हे माझे एकट्याचे यश नाही. मिशनशी संबंधित असलेल्या सर्वांचे हे यश आहे आणि मी हे त्या सर्वांना समर्पित करते. प्रवासादरम्यान ज्या प्रकारे मी प्रत्येक धर्माच्या लोकांना भेटले. त्यांना मानवतेचा संदेश देत होते. भारत देश हा वेगवेगळ्या धर्म आणि संस्कृतींनी बनलेला आहे. आज एखादी व्यक्ती भौतिक सुख मिळवण्यासाठी नैतिक मूल्ये, बंधुता आणि संस्कृतीपासून दूर जात आहे जी भविष्यासाठी चांगली चिन्हे नाही.


2018 मध्ये रेकॉर्डही बनला होता

सुफियाने 2018 मध्ये 16 दिवसात 720 किलाे मीटरचे अंतर पूर्ण केले, जे असे करणारी पहिली महिला धावपटू ठरली. या कामगिरीसाठी तिचे नाव इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समाविष्ट झाले आहे. सुफियाचा जन्म अजमेरमधील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला असून वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी वडिलांचा मृत्यू झाला. पालकत्वाची संपूर्ण जबाबदारी आईवर होती. सुफियाने थोड्या वेळासाठी एका एअरलाइन्स कंपनीत काम केले पण धावण्याची आवड पूर्ण करण्यासाठी तिने नोकरी सोडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com