
सातारा : सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीनुसार सातारा शहरातील भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी येथील पाणी कनेक्शनची थकबाकी माफ करण्याचा निर्णय पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला आहे. याबाबतची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. जीवन प्राधिकरणांतर्गत जिल्ह्यातील थकीत पाणी बिलावरील विलंब आकार आणि व्याज माफी देण्याच्या शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीवरही लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले.