

Heavy Rain Brings Relief from Heat, But Hail Ravages Farms in Khatav Taluka
sakal
पुसेगाव : खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील डिस्कळ, शिंदेवाडी, नवलेवाडी, ललगुण, बुध परिसरात वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास गारांसह पडलेल्या मुसळधार पावसाने येरळा नदीलाही पुरासारखी स्थिती झाली. या पावसाने वातावरणात गारवा आणला असला तरी गारा आणि वादळी वाऱ्याच्या तीव्रतेमुळे काही भागात भाजीपाला, बारमाही तसेच चारा पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे.