
वाई : कुसगाव (ता. वाई) येथील बेकायदा दगडखान व स्टोन क्रशरला परवानगी दिल्याच्या निषेधार्थ जिल्हा प्रशासनाच्या विरोधात मंत्रालयाच्या दिशेने निघालेला कुसगाव, एकसर, पार्टेवाडी ग्रामस्थांचा लाँग मार्च सोमवारी कात्रज बोगद्यात पोचला. या वेळी अर्धनग्न आंदोलन करत सातारा जिल्हा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.