Maan Khatav Politics: जयाभाऊंच्या बालेकिल्ल्यात माहेरच्या लेकीची एंट्री; हर्षदा देशमुख-जाधव यांच्या विजयाने माण-खटावमध्ये नवी राजकीय चर्चा?

Jaykumar Gore in Focus After Harshada Jadhav Victory: पुणे पदवीधरच्या विजयाचा माण-खटावमध्येही प्रभाव? हर्षदाताईंच्या सक्रियतेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
Jaykumar Gore Maan Khatav Politics in Focus After Harshada Deshmukh Jadhav Wins Pune Graduate Constituency Election in Satara

Jaykumar Gore Maan Khatav Politics in Focus After Harshada Deshmukh Jadhav Wins Pune Graduate Constituency Election in Satara

esakal

Updated on: 

सातारा : राज्याच्या सत्तेत ग्रामविकास मंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे आमदार जयकुमार गोरे यांच्या माण-खटाव मतदारसंघात आता नव्या राजकीय घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार म्हणून विजयी झालेल्या हर्षदा देशमुख-जाधव यांचे माहेर माण तालुक्यातील लोधवडे. विजयाच्या जल्लोषानंतर माहेरच्या भेटीत त्यांचे झालेले जंगी स्वागत आणि खुल्या जीपमधून त्यांनी केलेल्या राजकीय शैलीतील कृतीमुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. हर्षदा यांचा हा विजय केवळ पदवीधर मतदारसंघापुरता मर्यादित राहणार की माण-खटावच्या राजकीय समीकरणांवरही त्याचे पडसाद उमटणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यामुळे ‘जयाभाऊंच्या बालेकिल्ल्यात माहेरच्या लेकीची राजकीय सक्रियता वाढणार का?’ याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...