Harshada Deshmukh: साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा जल्लोष; हर्षदा देशमुख यांच्या विजयानंतर गुलालाची उधळण; कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

Satara NCP Workers Celebrate Harshada Deshmukh Victory: हर्षदा देशमुख जिंकल्या, साताऱ्यात राष्ट्रवादीचा जल्लोष; कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल
Harshada Deshmukh Wins in Satara NCP Workers Celebrate Victory With Gulal and Enthusiastic Slogans Across the City

Harshada Deshmukh Wins in Satara NCP Workers Celebrate Victory With Gulal and Enthusiastic Slogans Across the City

sakal

Updated on: 

सातारा : पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजयी आघाडी घेतल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनात आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर सर्व जण पोवई नाक्यावर आले व त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करत गुलालाची उधळण व फटाक्याची आतषबाजी करत विजयोत्सव साजरा केला. या वेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी पोवई नाका परिसर दणाणून गेला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com