esakal | सातारा जिल्ह्यात काेराेनाबाधितांचा मृत्यू हाेण्यामागची अशी आहेत कारणे
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा जिल्ह्यात काेराेनाबाधितांचा मृत्यू हाेण्यामागची अशी आहेत कारणे

सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेडच उपलब्ध होत नाहीत. यामध्ये "हायरिस्क' असलेल्यांना वेळेत बेड न मिळाल्यास त्यांचे दगावण्याचे प्रमाणही जास्त आहे.

सातारा जिल्ह्यात काेराेनाबाधितांचा मृत्यू हाेण्यामागची अशी आहेत कारणे

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जिल्ह्यात वाढले असून, दररोज 30 ते 35 रुग्णांचे मृत्यू होत आहेत. यामध्ये साधारण 80 टक्के नागरिक हे मधुमेह व उच्च रक्तदाब असलेले आहेत. तर उर्वरित दहा टक्के नागरिकांना दमा, किडनीसह इतर आजार असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. केवळ दहा टक्के नागरिकांचा आजाराकडे दुर्लक्ष केल्याने संसर्ग वाढून मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मधुमेही, उच्च रक्तदाब व टीबीच्या रुग्णांनी जास्त काळजी घेणे आवश्‍यक बनले आहे. 

कोरोनाबाधितांसोबत मृत्यूचे प्रमाणही जिल्ह्यात वाढले आहे. प्रत्येक जण काळजी घेत असला तरी इतर आजार असलेल्यांना कोरोनाचा संसर्ग तातडीने होत आहे. त्यातच अनेकदा अशा व्यक्ती कोरोनाची चाचणीच करण्याकडे दुर्लक्ष करतात किंवा ताप, अंगदुखीसह सर्दीचा आजार अंगावर काढत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढल्याने असे रुग्ण गंभीर होवून दगावण्याचे प्रमाणही वाढले आहे. शासनाने 60 वर्षांवरील व्यक्ती ही "हायरिस्क'मधील असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे वयोमान पाहिले तर बहुतांशी रुग्ण हे 60 वर्षांवरीलच आहेत. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, किडनीचे आजार, टीबी (क्षयरोग) या आजाराने बाधित असलेल्यांचे प्रमाण अधिक आहे.

शिवडेतील दरोड्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे पाचजण गजाआड; युवतीही ताब्यात

जिल्ह्यात 700 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. यामध्ये टीबी, उच्च रक्तदाब व मधुमेह आजार असलेल्या 80 टक्के नागरिकांचा समावेश आहे. तसेच दहा टक्के मृत्यू हे दमा व किडनीच्या आजाराने त्रास्त असलेल्या कोरोनाबाधितांचे आहेत. उर्वरित दहा टक्के नागरिकांचा आजाराकडे दुर्लक्ष केल्याने व वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झालेला आहे. असे रुग्ण हे अचानक बाधित होऊन मृत होत आहेत. संसर्ग कोणाला कधी होईल, याची माहिती देणारी चाचणी अद्याप आपल्याकडे आलेली नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळणे, हाच यावर उपाय आहे.

साताऱ्यातील जम्बो हॉस्पिटलवर 'शुक्लकाष्ठ'

सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेडच उपलब्ध होत नाहीत. यामध्ये "हायरिस्क' असलेल्यांना वेळेत बेड न मिळाल्यास त्यांचे दगावण्याचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे 60 वर्षांवरील नागरिकांनी जास्त काळजी घेणे, विनाकारण बाहेर न पडणे, बाहेर पडताना मास्कचा वापर प्राधान्याने करणे आदी शासनाने दिलेल्या सूचनांचे गांभीर्याने पालन करणे आवश्‍यक आहे.

खुशखबर! प्लाझ्मा थेरपीसाठी कृष्णा हॉस्पिटलला मान्यता; गंभीर कोरोनाबाधित रुग्णांचा जीव वाचण्यास होणार मदत  
 


सध्या कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका कोमऑर्बिड रुग्णांना सर्वाधिक आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी गर्दीत न जाणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच साधी लक्षणे दिसली तरी तातडीने चाचणी करून उपचार करून घेणे गरजेचे आहे. तसेच रुग्णालयात असे रुग्ण दाखल झाल्यानंतर ते लवकर गंभीर होतात, त्यामुळे अशा रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्‍टरांकडूनच उपचार करून घेणे गरजेचे असते. त्यामुळे सर्वाधिक काळजी 60 वर्षांवरील कोमऑर्बिड रुग्णांनी घेणे गरजेचे आहे.

डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा 


जिल्ह्यातील कोरोना मृत्यूचे अपडेट्‌स... 

 • कोरोनामुळे मृतांची संख्या : 700
 •  
 • दररोज मृत्यू होणारे : 30 ते 35

 काँग्रेस आमदारांच्या उत्तराने उलट-सुलट चर्चांना पूर्णविराम 

मृत्यूचे प्रमाण

 • 60 वर्षांवरील रुग्णांचे 80 ते 90 टक्के 
 •  
 • दमा व इतर आजार : दहा टक्के 
 •  
 • किडनी आजाराचे : दहा टक्के 
 •  
 • टीबी, उच्च रक्तदाब, मधुमेह : 80 टक्के 
 •  
 • आजाराकडे दुर्लक्ष केल्याने : दहा टक्के 


Edited By : Siddharth Latkar