नदीपात्रातील कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात; प्रशासनाचे साफ दुर्लक्ष

नदीपात्रातील कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात; प्रशासनाचे साफ दुर्लक्ष

उंब्रज (जि. सातारा) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत तारळी नदीपात्रालगत उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. तर कचरा नदीपात्रात मिसळून नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. तसेच पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांना रोगराईचा सामना करावा लागत आहे. 

उंब्रज येथील पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तारळी नदीपात्रालगत पुलानजीक ग्रामपंचायत प्रशासनाने कचरा डेपो केला आहे. या कचरा डेपोवर मोकाट जनावरे ताव मारताना दिसत आहेत. येथील ग्रामपंचायत गावातील सगळा कचरा गोळा करून महामार्गालगत टाकत आहे. तसेच येथे मृत जनावरे टाकली जातात. हा कचरा नदीपात्रात पसरत असून, नदीचे पाणी अस्वच्छ होत आहे. या नदीपात्रातच उंब्रजची पिण्याच्या पाण्याची जॅकवेल हा काही अंतरावर आहे. त्यामुळे सदरचा कचरा पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. यामुळे येथील नागरिकांना अशुद्ध पाण्याबरोबरच पोटाचे विकारासारख्या अनेक साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत आहे. 

हा कचरा पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने नळातून सुरवातीस अशुद्ध पाणी येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. तसेच नागरिकांना कचऱ्यापासून होणाऱ्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष कधी देणार, असा सवाल नागरिक करत आहेत. तर ही समस्या अजून किती वर्षे अशीच सुरू राहणार, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com