
कोपर्डे हवेली : शामगाव (ता. कऱ्हाड) येथील कालबाह्य नळपाणी पुरवठा योजना आणि विहिरीतील दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. गावात पोटदुखी, ताप, थंडी, कणकण, जुलाब यासारख्या आजारांसह कावीळचे सहा रुग्ण आढळले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.