esakal | तौक्ते चक्रीवादळाचा कास, बामणोलीला तडाखा; महाबळेश्वरात 'मुसळधार'
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain

VIDEO पाहा : तौक्ते चक्रीवादळाचा कास, बामणोलीला तडाखा; महाबळेश्वरात 'मुसळधार'

sakal_logo
By
सूर्यकांत पवार

कास : तौक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) तडाखा बसल्याने कास, बामणोली, तापोळा तसेच सह्याद्रीनगर, कुसुंबीमुरा परिसरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत असून पावसाने घरे, विजेचे पोल, शेतांच्या ताली यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Heavy Rain In Kas Bamnoli Area Satara News)

चक्रीवादळामुळे ऐन उन्हाळ्यात हा पाऊस पडत असला तरी आषाढातील पावसाचा अनुभव लोकांना येत आहे. याचा जास्त फटका डोंगर माथ्यावरील सह्याद्रीनगर, कुसुंबीमुरा, एकीव, मांटी, म्हातेमुरा, गाळदेव, निपाणीमुरा ही सह्याद्रीच्या माथ्यावर गाव असल्याने जोरदार वारा व पावसाने झोडपून काढले. प्रचंड धुके, पाऊस व वारा यामुळे मान्सूनच्या पावसाचा अनुभव सर्वत्र येत होता. ओढे, नाले, ओहोळ, धबधबे ओसंडून वाहत आहेत.

अनेक ठिकाणी घरांची छपरे उडाली, तर दोन दिवसांपासून वीज गायब असल्याने भर पावसात पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. डोंगर माथ्यावरील सह्याद्री नगर, चिकणवाडी व इतर गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल आहेत. पण, दोन दिवस वीज नसल्याने बोअरवेल बंद आहेत. परिणामी, बाहेर धो-धो पाऊस पन घरात थेंबभर पाणी नाही अशी अवस्था झाली आहे.

माशाच्या गळाला लागला बाँम्ब; घटनास्थळी पोलिसांसह ATS दाखल

Heavy Rain In Kas Bamnoli Area Satara News

loading image