Mahabaleshwar Rain : महाबळेश्वरात पावसाचा धडाका कायम; रस्ते झाले जलमय

महाबळेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे.
Heavy Rain in Mahabaleshwar Taluka
Heavy Rain in Mahabaleshwar Talukaesakal
Summary

महाबळेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे.

महाबळेश्वर (सातारा) : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची धुवाधार (Heavy Rain in Mahabaleshwar) बॅटिंग सुरू आहे. येथील वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलाव परिसर हा धुक्यात हरवला असून, या संततधार पावसाने महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्त्यावर गहू गेरवा संशोधन केंद्रालगतच्या ओढ्याचे पाणी वाढल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही काळ मंदावली. या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. वेण्णा नदीच्या ओसंडून वाहत आल्याने लिंगमळा परिसर जलमय झाला. शेतीमध्ये सर्वत्र पाणीच पाणी पाहावयास मिळत आहे. काल रात्रीपासून आजही दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले.

शहरातील मुख्य बाजारपेठेतील महाबळी यांच्या मिळकतीमधील जुनी भिंत बोळाच्या बाजूला पडल्याने सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. नगरपालिकेतील मुख्य लिपिक आबा ढोबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी येऊन त्वरित पाहणी केली. येथील जनजीवन काही प्रमाणात विस्कळित झाले आहे. आज दिवसभर पावसाची धुवांधार बॅटिंग सुरू होती. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १४८ मिलिमीटर (६ इंच) पावसाची नोंद झाली आहे. मेटगुताड गावाजवळ २२ केव्हीची विद्युत लाइनवर पडलेल्या झाडाच्या फांद्या महावितरणचे कर्मचाऱ्यांनी हटवून विद्युत पुरवठा सुरळीत केला. जावली पुलाजवळ चोकअप झालेली मोरी गावातील तलाठी व कोतवाल यांनी स्वच्छ करून पाण्याचा प्रवाह सुरळीत केला.

Heavy Rain in Mahabaleshwar Taluka
भाजपला शिंगावर घेणारे खासदार संजय राऊत कोण आहेत? जाणून घ्या 'प्रवास'

जावली कोयना नदीशेजारी खचलेल्‍या रस्त्याची जिल्हा परिषदेच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करण्यात आली. शिंदोळा येथे दोन दिवसांपूर्वी दरड काढलेल्या ठिकाणीच पुन्हा कोसळलेली दरड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जेसीबीच्या साह्याने हटवून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत सुरू करण्यात आला. पार येथील शिवकालीन पुलासमोर लाकडे व कचरा जमा झाला होता. त्या ठिकाणी विभागाच्या वतीने साफसफाई करण्यात आली. तालुक्यातील बिरवाडी, चतुरबेट, दाभेमोहन, घावरी-येरणे रस्त्यावर काही प्रमाणात कोसळलेली दरड बांधकाम विभागाच्या वतीने जेसीबीच्या साह्याने हटवून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला. चतुरबेट ते दुधगाव भागातील बंधारा/पूल व नदीचा पाण्याचा प्रवाह येथे जमा झालेली लाकडे बांधकाम विभाग व चतुरबेट व दुधगाव गावातील ग्रामस्थांच्या मदतीने बाजूला करून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आला.

Heavy Rain in Mahabaleshwar Taluka
दगडफेक करणाऱ्यांना 1000, तर बॉम्बस्फोट करणाऱ्यांना 5000 रुपये.. जाणून घ्या हिंसाचार कसा झाला?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com