esakal | कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उघडले
sakal

बोलून बातमी शोधा

कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उघडले

कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उघडले

sakal_logo
By
विजय लाड

कोयनानगर : कोयना धरण (koyna dam) पुर्ण क्षमतेने भरले असतानाच धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा एकदा दमदार पाऊस सुरु झाला आहे. धरण धरणात १०२.२८ टीएमसी पाणीसाठा आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता संपत आल्याने वाढत जाणारी धरणाची जलपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटावर उघडले आहेत. त्यातून नदीपात्रात २५ हजार क्युसेक पाणी सोडल जात आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जुन ते सप्टेंबर चार महिन्यात शंभर टक्के पाऊस झाला आहे. चार महिन्यातील १०४ दिवसात १०५ टीएमसी पाणी कोयना धरणात आहे. आजअखेर धरणात १२७ टीएमसी पाणीसाठय़ाची आले आहे. २२ ते २९ जुलै या कालवधीत धरणात ३७ टीएमसी पाणीसाठ्याची आवक झाली होती. त्यावेळी धरणात ६६ टीएमसी पाणीसाठा होता. त्यामुळे धरण 103 टीएमसी भरले होते. आजही पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे आज कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता नियंत्रणात आणण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजासह पायथा वीज गृह आज दुपारी दोन वाजता कार्यान्वीत केली.

हेही वाचा: योगींच्या जाहिरातीत कोलकत्याचा उड्डाणपुल; तृणमूलचा आक्षेप

कोयना धरणातील १०३ टीएमसी पाणीसाठ्याचे चे विधीवत जलपूजन व ओटी भरण कार्यक्रम राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई देसाई यांच्या शुभ हस्ते झाले. जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार. कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार, तहसीलदार योगेश्वर टोम्पे, अशोकराव पाटील, उपअभियंता आशिष जाधव, सरपंच शैलेंद्र शेलार, शशिकांत जाधव, शाखा अभियंता रेवण बिराजदार, अनिल राणे सहायक पोलिस निरिक्षक चंद्रकांत माळी उपस्थित होते.

loading image
go to top