Karad Heavy Rain : उंब्रजसह कऱ्हाड परिसराला झोडपले! तासाभराच्‍या पावसाने महामार्गावर पाणीच पाणी; वाहनांच्‍या रांगा

उंब्रजसह परिसराला आज वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह आलेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले.
Karad Heavy Rain

Karad Heavy Rain

sakal

Updated on

उंब्रज - उंब्रजसह परिसराला आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह आलेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले. सुमारे तासभर झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले.

दरम्यान, या अवकाळी पावसाने उंब्रज येथील पाटण तिकाटणा तसेच राष्ट्रीय महामार्गावर भोसलेवाडी येथे पाण्याचे तळे निर्माण झाल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्‍या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. उंब्रजसह परिसरात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. नाले पाण्याने तुडुंब वाहण्‍याबरोबर ठिकठिकाणी रस्त्यावर व शेतात पाणी साचले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com