
सातारा : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून उघडीप दिलेल्या पावसाने मागील दोन दिवसांत जोरदार सुरुवात केली आहे. कोयना, कण्हेर, उरमोडी, धोम व तारळी या धरण क्षेत्रात आज सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी या पाचही धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. वेधशाळेने पुढील चार दिवस सातारा जिल्ह्याला यलो अलर्ट दिल्याने प्रशासनही सतर्क झाले आहे.