माण तालुक्‍यात जोरदार पाऊस; ब्रिटिशकालीन धरण भरले तुडुंब

सल्लाउद्दीन चोपदार
Wednesday, 16 September 2020

कायम दुष्काळी भाग अशी ओळख असणा-या माण तालुक्यात पावसाने चांगलीच हजेरी लावत तेथील नदी, नाले व बंधारे तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. दरवर्षी माणला परतीच्या पावसाचा फटका बसत असतो, त्यामुळे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतो. मात्र, या सगळ्यात अशी बंधारे तुडुंब भरुन वाहू लागली की, येथील शेतक-यांनाही काही अंशी दिलासा मिळत असतो.

म्हसवड (जि. सातारा) : माण तालुक्‍यातील देवापूरनजीकचे राजेवाडी धरण भरून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. माण तालुक्‍यात स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश राजवटीत राणी व्हिक्‍टोरिया एलिझाबेझ यांनी माणमधील दुष्काळात जनतेला रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रमुख उद्देशाने 140 वर्षांपूर्वी या मातीच्या बंधाऱ्याच्या धरणाचे बांधकाम केले होते. 

सुमारे दोन टीएमसीचे पाणी साठवण क्षमतेचे हे धरण आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र सातारा जिल्ह्यात, बंधारा सांगली जिल्ह्यात व सिंचन क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात असा तिहेरी संगम पाहण्यास मिळतो. सलग दुसऱ्या वर्षीही हे धरण भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागल्यामुळे सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

...तरच आम्ही पुढाकार घेऊ; मराठा आरक्षणाच्या मुद्यावर उदयनराजेंचे माेठे वक्तव्य

कायम दुष्काळी भाग अशी ओळख असणा-या माण तालुक्यात पावसाने चांगलीच हजेरी लावत तेथील नदी, नाले व बंधारे तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. दरवर्षी माणला परतीच्या पावसाचा फटका बसत असतो, त्यामुळे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतो. मात्र, या सगळ्यात अशी बंधारे तुडुंब भरुन वाहू लागली की, येथील शेतक-यांनाही काही अंशी दिलासा मिळत असतो. त्यामुळे परतीच्या पावसाच्या आधीच येथील शेतकरी नियोजन करत असल्यामुळे पिकांना फारसा फटका बसत नसल्याचे पहायला मिळते.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain In Man Taluka Satara News