esakal | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

Koyna Dam

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस

sakal_logo
By
हेमंत पवार -सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोयना धरणातुन तीन दिवासपासुन मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे कृष्णा-कोयना नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा विचार करुन प्रभारी तहसीलदार आनंदराव देवकर यांनी गणेशमुर्तींच्या विसर्जनासाठी कृष्णा- कोयना नदीपात्रात जावु नये असे आवाहन केले आहे.

कऱ्हाड-पाटण तालुक्यात चार दिवसापासुन जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कोयनासह अन्य धरणातील पाणी पातळी वाढली आहे. सध्या कोयना धरणात १०४. ९२ टीएमसी पाणी साठा आहे. तो साठा नियंत्रीत करण्यासाठी कोयना धरणातुन ५० हजार क्येसक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर दोन्ही तालुक्यातील अन्य धरणातुनही पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे कोयनेसह कृष्णा व अन्य उपनद्यांची पाणी पातळी वाढली आहे. त्याचदरम्यान गणेशोत्सवातील पाच दिवसांच्या घरगुती गणेशमुर्तींचे विसर्जन आज होत आहे. त्यामुळे भाविक नदीपात्रात मुर्ती विसर्जनासाठी जातात. ते गेल्यावर एखादा अनर्थ घडु नये यासाठी प्रभारी तहसीलदार देवकर यांनी

गणेश विसर्जनासाठी कऱ्हाड तालुक्यातील ग्रामपंचायतींना स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहे. त्याचबरोबर कृष्णा -कोयनेसह अन्य उपनद्यांना जावु नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

कऱ्हाड पालिकेमार्फत सोय

कऱ्हाड पालिकेने शहरातील १४ वॉर्डमध्ये स्वतंत्र १४ फिरत्या मूर्ती संकलन पथकांची नियुक्ती केली आहे. भाविकांनी नदीवर मुर्ती विसर्जनासाठी न येता संबंधित संकलन केंद्रावर मुर्ती द्यावा, त्यांचे विधीवत विसर्जन करण्यात येईल, असे आवाहन केले आहे. त्याचबरोबर पोलिस दलानेही चोख बंदोबस्त ठेवला आहे.

loading image
go to top