उरमोडी नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

सिध्दार्थ लाटकर
Wednesday, 14 October 2020

उरमोडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जलाशयात आवक वाढल्यामुळे आज (बुधवार) विद्युतगृहातून 450 क्युसेक विसर्ग चालू आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढू लागल्याने धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला आहे.

सातारा : उरमोडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जलाशयात आवक वाढल्यामुळे आज (बुधवार) विद्युतगृहातून 450 क्युसेक विसर्ग चालू असून रात्री नऊ वाजता सांडव्यातून दोन वक्रद्वारे 0.25 मीटरने उचलून 1450 क्यूसेक विसर्ग चालू करण्यात येत आहे.

नदीपात्रात एकूण 1900 क्यूसेक विसर्ग होणार आहे. पर्जन्यमान व आवक वाढल्यास विसर्गात वाढ करण्यात येईल. तरी उरमोडी नदी पात्रात कोणीही प्रवेश करू नये, असे आवाहन करुन उरमोडी नदी काठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढू लागल्याने धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला आहे.

सातारकरांनाे सावधान! आवश्यकता असल्यास घराबाहेर पडा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rains In Uarmodi Dam Area Satara News