वीर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस; पाण्याचा विसर्ग सुरू

अशपाक पटेल
Wednesday, 14 October 2020

नीरा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नीरा नदीतही पाणी वाढू लागले आहे. पावसामुळे दोन दिवसांपासून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी वाढत आहे. त्यामुळे वीर धरणामध्ये पाण्याची आवक होत असल्याने वीर धरणातून विद्युतगृहातून 600 क्‍युसेक व दरवाजातून 13911 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीमध्ये सुरू करण्यात आला आहे.

खंडाळा (जि. सातारा) : वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढू लागल्याने धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला आहे. वीर धरणातून 14 हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीमध्ये करण्यात येत आहे, अशी माहिती धरण अभियंता विजय नलवडे यांनी दिली. 

दरम्यान, नीरा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नीरा नदीतही पाणी वाढू लागले आहे. पावसामुळे दोन दिवसांपासून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी वाढत आहे. त्यामुळे वीर धरणामध्ये पाण्याची आवक होत असल्याने वीर धरणातून विद्युतगृहातून 600 क्‍युसेक व दरवाजातून 13911 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीमध्ये सुरू करण्यात आला आहे. वीर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे उचलण्यात आले असून, त्यातून 13911 क्‍युसेक व विद्युतगृहातून 600 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. 

पावसाच्या मुसळधार वर्षावाने सातारा जिल्हा गारठला!

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rains In Veer Dam Area Satara News