राज्यातील 'या' जिल्ह्यांत काही तासात मुसळधार; 'हवामान'ने वर्तवला अंदाज!

Heavy Rain
Heavy Rainesakal

सातारा : सध्या वातावरणातील बदलामुळे राज्यातील काही भागात पावसाने (Heavy Rain) जोरदार हजेरी लावायला सुरुवात केलीय. कालच मुसळधार पावसाने धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, बीड, लातूर, रायगड या जिल्ह्यांना झोडपून काढले, तर आज पुन्हा हवामान विभागाने (Weather Department) इशारा देत, पुढील तीन तासात पुणे, सातारा, अहमदनगर, रत्नागिरी, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवलीय. त्यामुळे या कालावधित नागरिकांनी घरीच थांबावे, अशा सूचनाही हवामानच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. (Heavy Rains Will Fall In Pune Satara Ahmednagar Ratnagiri And Vidarbha Districts Of Maharashtra In Next Three Hours)

Summary

सध्या वातावरणातील बदलामुळे राज्यातील काही भागात पावसाने (Heavy Rain) जोरदार हजेरी लावायला सुरुवात केलीय.

गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यावर अस्मानी संकट घोंघावतंय, त्यामुळे शेतकऱ्यांत (Farmer) भीतीचे वातावरण निर्माण झालेय. या महिन्यात पेरणी केलेल्या पिकांना या अवकाळीचा जबर फटका बसणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे, त्यामुळे या कोरोनासोबतच अवकाळीचे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट निर्माण झालंय. जून महिन्याची वाट पाहत शेतकऱ्यांनी काही भागात पिकांची लागवड करुन घेतलीय. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सततच्या पावसामुळे बियाणं कुजण्याचे प्राण वाढलेय, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर हा देखील चिंतेचा विषय बनलाय.

Heavy Rain
Heavy Rain : कऱ्हाड-मलकापुरात मुसळधार; रस्ते झाले 'जलमय'

आज हवामान विभागाने पुणे, सातारा, अहमदनगर, रत्नागिरी, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर व विदर्भाला इशारा देत पावसाची शक्यता वर्तवली असून पुढील तीन तासात या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडणार आहे. काल देखील यातील काही जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे, त्यामुळे आज पुन्हा अस्मानी संकटाचा जिल्ह्यांना सामना करावा लागणार आहे. अद्याप मान्सून केरळच्या किनाऱ्यावरच न पोहोचल्याने मान्सूनचे आगमन काहीसे लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. त्यातच 'यास' चक्रीवादळाचा परिणाम जाणवू लागला आहे. पश्चिम भागांसह अन्य सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागते आहे.

Heavy Rains Will Fall In Pune Satara Ahmednagar Ratnagiri And Vidarbha Districts Of Maharashtra In Next Three Hours

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com