

Authorities counsel families and minors amid rising concerns over child marriage cases in Satara district.
Sakal
-स्वप्नील शिंदे
सातारा: महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत (२०२४-२५) ३० हजारांहून अधिक अल्पवयीन मुली बेपत्ता होणे किंवा त्यांचे अपहरण होणे आदी गुन्हे नोंदवले गेले आहेत. सातारा जिल्ह्यातही हे प्रमाण वाढत असून, ही एका मोठ्या सामाजिक संकटाची चाहूल आहे. बेपत्ता होणाऱ्या अनेक मुलींच्या प्रकरणांचा शेवट छुप्या बालविवाहात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. ‘प्रेमप्रकरण’ या सबबीखाली समाजाकडून बालविवाहाला मिळणारी मूक संमती आणि यंत्रणेतील अनास्था यामुळे राज्याचे पुरोगामी पाऊल मागे पडत असल्याचे वास्तव आहे.