esakal | मलकापूरला जिल्ह्यात उच्चांकी लसीकरण; उपनगराध्यक्ष शिंदेंची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

मलकापूरला जिल्ह्यात उच्चांकी लसीकरण; उपनगराध्यक्ष शिंदेंची माहिती

sakal_logo
By
राजेंद्र ननावरे

मलकापूर : जिल्ह्यामध्ये आठ ते १४ ऑक्टोबरदरम्यान ‘कोविड- १९ लसीकरण कवच कुंडल’ अभियान राबवण्यात आले. त्याअंतर्गत प्रभागनिहाय लसीकरण कार्यक्रम पालिकेने राबवला. पालिकेने प्रभाग क्रमांक दोनमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गटात पहिल्या नंबरचे लसीकरण करून जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.

हेही वाचा: राज्याचा मोठा निर्णय; आमदारांना मिळणाऱ्या विकासनिधीमध्ये वाढ

लसीकरण केंद्राचे उद्‍घाटन नगरसेविका नूरजहाँन मुल्ला यांच्या हस्ते झाले. नगरसेवक दिनेश रैनाक, वरिष्ठ लिपिक ज्ञानदेव साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते राजू मुल्ला, प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, नोडल अधिकारी हेमंत पलंगे, रामचंद्र शिंदे, दादासाहेब शिंदे, पांडुरंग बोरगे, शरद कदम, काले प्राथमिक आरोग्य केंद्राचे राजू पटेल, डॉ. जयश्री देसाई, आरोग्य सेविका सुलोचना पावणे व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. पालिकेने ७ एप्रिल २०२१ पासून लसीकरण केंद्र कार्यान्वित केले आहे. ११ ऑक्टोबर २०२१ अखेर १६७७९ नागरिकांना लस देण्यात आली आहे. पालिकेने नियुक्त केलेल्या आशा सेविकांच्या मार्फत शहरातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे सर्वेक्षण सुरू असून, ज्या नागरिकांनी लस घेतलेली नाही, अशा नागरिकांना वैयक्तिक स्तरावर संपर्क साधून घेण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. वयोवृद्ध नागरिक लसीकरण केंद्रावर उपस्थित राहू शकत नाहीत. त्यांना आरोग्य सेविकांमार्फत घरी जाऊन लस दिली जात आहे, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

loading image
go to top