

Dr. Rohan Akolkar receives global recognition for his outstanding services at major international sporting events.
Sakal
आसू : फलटण- बारामती परिसरातील प्रख्यात फिजिओथेरपिस्ट डॉ. रोहन अकोलकर यांची ‘वर्ल्ड एक्सलन्स बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये गौरवपूर्ण नोंद करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती आणि फिफा वर्ल्ड कपमध्ये महत्त्वपूर्ण सेवा देणारे ते भारतातील पहिले आणि एकमेव फिजिओथेरपिस्ट ठरले आहेत. भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.