

An emotional moment as Jadhav brother and sister reunite after 24 years at their ancestral home in Dushere.
esakal
-हेमंत पवार
कऱ्हाड : कऱ्हाड (जि.सातारा) तालुक्यातील दुशेरे गावात अलीकडेच घडलेली बहिण भावांची भेट मनाला चटका लावत डोळ्यांच्या कडा ओलावणारी आणि नात्यांच्या जिव्हाळ्याची आठवण करून देणारी ठरली. (कै.) हरी तुकाराम जाधव यांच्या कुटुंबातील सर्व बहिण-भाऊ, आत्तेभाऊ, मामेभाऊ असे तब्बल २६ जण एकाच छताखाली जमले. ज्या घरात त्यांनी बालपण घालवले, खेळले, भांडणं केली, हसले-रडले त्याच घरात पुन्हा पाऊल टाकताना प्रत्येकाच्या मनात आठवणी दाटुन आल्या.