पूरग्रस्त गावांतील महिलांना 'या' सुविधा द्या : ऍड. वर्षा देशपांडे

विजय लाड
Thursday, 9 July 2020

पूरग्रस्त गावांमध्ये महिलांची विशेषतः अधिक कुचंबना होते. याकडे ऍड. वर्षा देशपांडे यांनी लक्ष वेधले. त्यांना सन्मानाने राहता यावे यासाठी गेल्या वर्षी संस्थेने "डिग्निटी किट' पुरविली होती. यावर्षी सॅनिटरी नॅपकिनची वेंडिंग मशिन या गावांना पुरवावीत, अशी मागणी त्यांनी केली. देणगीदारांच्या माध्यमातून अशी मशिन पुरविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन मंत्री देसाई यांनी दिले.

कोयनानगर (जि.सातारा) : पाटण आणि कऱ्हाड तालुक्‍यांतील पुराचा धोका असलेल्या गावांत गेल्या वर्षी उद्‌भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यावर्षी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. संकटग्रस्त गावांतील लोकांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी उपयोगात येणाऱ्या प्राथमिक शाळांच्या इमारतींची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पूरस्थिती निर्माण होण्यापूर्वी आणि नंतरही प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थांनी खांद्याला खांदा लावून काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
...तर तुमच्या आधी माझीच धरणात उडी : नरेंद्र पाटील 

"लेक लाडकी अभियान' आणि ऍक्‍शन ऍड या संस्थेतर्फे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाटण येथे आयोजित आढावा आणि नियोजन बैठकीत श्री. देसाई बोलत होते. पाटण-कोयना भागातील दहा व कऱ्हाड तालुक्‍यातील दोन अशा 12 पूरग्रस्त गावांमधील 750 बाधित कुटुंबांसोबत संस्था काम करत आहे. गेल्या वर्षीचे अनुभव लक्षात घेता पुराचा सामना करण्यासाठी यावर्षी काय करता येईल, याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. ऍड. वर्षा देशपांडे यांनी अनेक सूचना केल्या. मंत्री देसाई म्हणाले, "नेटवर्कचा प्रश्न सोडविण्यासाठी नवीन टॉवर उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. काही गावांत वायरलेस फोनसाठी चाचपणी सुरू आहे. नावडीसाठी पर्यायी रस्ता मंजूर झाला आहे. पुराचा धोका असलेल्या गावांत पिण्याचे पाणी आणि गटारांची सफाई आदी कामे सुरू आहेत. कोयना बस स्थानकातील स्वच्छतागृहाविषयी आगार व्यवस्थापकांशी चर्चा करू.''
कऱ्हाड : केबल चॅनेलद्वारे ज्ञानदान, पालिका शाळा क्रमांक तीनच्या प्रयत्नास यश  

बैठकीला आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शेखर ताम्हाणे, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. चंद्रकांत यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, पोलिस उपअधीक्षक अशोक थोरात, पोलिस उपनिरीक्षक तृप्ती सोनावणे, ऍड. शैलजा जाधव, दीपेंती चिकणे, कैलास जाधव, संजय कुंभार, पूरबाधित 12 गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, गावोगावचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 

वेंडिंग मशिनसाठी प्रयत्न 

पूरग्रस्त गावांमध्ये महिलांची विशेषतः अधिक कुचंबना होते. याकडे ऍड. वर्षा देशपांडे यांनी लक्ष वेधले. त्यांना सन्मानाने राहता यावे यासाठी गेल्या वर्षी संस्थेने "डिग्निटी किट' पुरविली होती. यावर्षी सॅनिटरी नॅपकिनची वेंडिंग मशिन या गावांना पुरवावीत, अशी मागणी त्यांनी केली. देणगीदारांच्या माध्यमातून अशी मशिन पुरविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन मंत्री देसाई यांनी दिले.

पाचगणीच्या नगराध्यक्षांना डिवचणे राष्ट्रवादीच्या 'या' गटास पडले महागात

घराबाहेर पडण्यापुर्वी ही बातमी वाचा; अन्यथा तुमच्यावरही हाेऊ शकते कारवाई

संपादन - सिद्धार्थ लाटकर

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister Shambhuraj Desai Held Meeting In Patan