फलटण: हॉटेल व्यावसायिकास प्रेमाच्या जाळ्यात ओढून, खोट्या गुन्ह्यात अडकवतो अशी धमकी देऊन मारहाण करत खंडणी उकळणाऱ्या संशयितांना फलटण शहर पोलिसांनी दोन तासांत जेरबंद केले. .Interfaith love Story: कॉलेज जीवनात अडकले ‘प्रेमाच्या बेडीत’; जाती-धर्माच्या चौकटीपलीकडचे प्रेम, फिरदोस-मेहवश यांची प्रेमकहाणी!.साहिल रवी तारे (रा. दत्तनगर, फलटण), वैभव बाळासाहेब सस्ते (रा. सस्तेवाडी, ता. फलटण), रोहन नवीन काकडे (रा. मंगळवार पेठ, फलटण), विनायक बाळासाहेब जाधव (रा. ठाकुरकी, ता. फलटण), राज राम बोके (रा. मंगळवार पेठ, ता. फलटण) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे असून, यामध्ये अन्य दोन अनोळखी व एका महिलेचा समावेश आहे..पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी (ता. ११) आनंद काशिनाथ दळवी (रा. कापूरहोळ, ता. भोर, जि. पुणे) यांना फलटण येथील एका महिलेने मोबाईल फोनवर व्हॉटसअॅप कॉल करून प्रेमाच्या जाळ्यात ओढले, तसेच अश्लील बोलून शुक्रवारी (ता. १३) दुपारी १२.१५ वाजता बुधवार पेठ, फलटण येथील प्लॅटवर बोलावले. बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात तुला अडकवतो, अशी धमकी फिर्यादी आनंद दळवी यांना संशयितांनी दिली. त्यानंतर मारहाण करून ४० लाख रुपयाची खंडणीची मागणी केली. .त्यापैकी एक लाख ९५ हजार रुपये रोख व एटीएममधून, तसेच क्रेडीट कार्डमधून जबरदस्तीने पैसे काढून घेतले. फिर्यादीस फलटणमधून पुणे रस्त्याला सोडण्याच्या बहाण्याने घेऊन जात दोन अनोळखींनी गाडी अडवून त्यांचे गळ्यातील २० तोळे वजनाची ३० लाख रुपये किमतीची सोन्याची चेन मारहाण करून जबरदस्तीने काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे करीत आहेत..सोलापूरला बुलेट ट्रेनचे ऐतिहासिक गिफ्ट! पुणे एक तासात, हैदराबाद सव्वा, तर मुंबई अडीच तासांत गाठणे होणार शक्य... कारवाईत पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलिस उपअधीक्षक रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरविंद काळे, सहायक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे, पोलिस उपनिरीक्षक दिनेश शिंदे, अंमलदार नानासाहेब होले, नितीन सजगणे, संतोष नाळे, जितेंद्र टिके, काका कर्णे, अतुल बडे, मुकेश घोरपडे, महेश जगदाळे, निखिल गायकवाड, जयदीप यादव, गणेश अवघडे, विक्रम कुंभार व पथकाने सहभाग घेतला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.