
कऱ्हाड : शहरातील पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासीयांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागण्याबाबत आज एक आश्वासक पाऊल उचलले गेले आहे. येथील आरक्षित जागेवरील पार्किंगचा उल्लेख काढून तिथे बेघरांसाठी घरे असा बदल करण्याची मागणी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली.