
सातारा : स्थळ मुंबई- पुणे द्रुतगती मार्ग. वेळ दुपारची. कडकडीत उन्हातान्हाची. त्यावरून एक छोटा मुलगा एकटाच चालत निघाला होता. त्याचवेळी एक पोलिस कर्मचारी या मार्गावर त्यांच्या वाहनाची वाट पाहात उभा होता. वास्तविक या मार्गावर पादचाऱ्यांना परवानगी नाही. त्यामुळे चालत येणाऱ्या मुलाबाबत कुतूहल जागे होऊन त्यांनी विचारणा केली अन् उलगडा झालेल्या घटनाक्रमाने खाकीतील वर्दीतून माणुसकी पाझरली. एवढेच नव्हे तर त्या चिमुरड्याला माणुसकीच्या सावलीतून वडिलांकडे सुपूर्दही करण्यात आले.