Mangrove
Mangrovesakal

कऱ्हाडला शेकडो एकर क्षेत्र खारफुटीग्रस्त; ठोस उपायांचा अभाव

कृष्णा नदीकाठावरील बहुतांशी गावांत शेतकऱ्यांसमोर संकट

रेठरे बुद्रुक : तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा कालव्याद्वारे(krishna canol) सिंचित शेतजमिनीत पाण्याचा अतिवापर झाल्याने शेकडो एकर क्षेत्र खारफुटीचे(Mangrove) बनले आहे. रेठरे बुद्रुकसह सैदापूर, गोवारे, सयापूर, टेंभू, कोरेगाव, कार्वे, वडगाव हवेली, कोडोली, दुशेरे, शेरे, गोंदी व खुबी येथील शेकडो एकर क्षेत्र खारफुटीने बाधित झाले आहे. बाधित क्षेत्राला वाचवण्यासाठी कृष्णा कालवा विभाग व शासनाच्या जलनिःसारण विभागाने ठोस उपाययोजना न केल्याने मोठ्या संकटाशी सामना करावा लागतो आहे.

क्षेत्र वाचवण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करताना शेतकऱ्यांचे झालेले तोकडे प्रयत्न व हा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित विभागाची अनास्था असल्याने हा प्रश्न रौद्ररूप धारण करू पाहात आहे. कऱ्हाडजवळ खोडशी येथे कृष्णा नदीवर बंधारा बांधून त्यातून कालव्याद्वारे पाणी शेतीस पोचवण्यात आले आहे. खोडशी येथे उगम पावलेला कालवा कऱ्हाड, वाळवा, पलूस तालुक्यांतून वाहत जाऊन तासगाव तालुक्यातील वसगडे येथे येरळा नदीस मिळतो. ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्व काळात मोठ्या दूरदृष्टीने कृष्णा व येरळा नदीचा नदीजोड प्रकल्प पूर्ण केला आहे. या कालव्याद्वारे चार तालुक्यांतील अंदाजे दोन हजार हेक्टर शेतीचे क्षेत्र विनाविजेवर सिंचित झाले आहे. कालवा तिमाही व नंतरच्या काळात सहामाही वाहत असल्याने तितकेसे क्षेत्र बागायती नव्हते. मात्र, अलीकडील दोन दशकांत कालव्यात सहामाहीपेक्षा अधिक काळ पाणी राहत असल्याने बागायती पिके वाढली आहेत. एकीकडे बदललेली पीकपद्धत शेतकऱ्यांच्या विकासाला चालना देत असली, तरी कृष्णा कालव्यातून पाझरणाऱ्या पाण्याचे तितकेच घातक परिणाम शेतकरी झेलत आहेत. बारमाही कालव्यातील पाणी पाझराचे प्रमाण दुपटीने वाढले आहे.

Mangrove
सातारा जिल्ह्यात खासगी कारखाने गाळपात आघाडीवर

वाळव्यात निचरा पद्धतीचा प्रयोग

वाळवा तालुक्यातील काही गावांत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकारातून निचराप्रणाली राबविली आहे. वाहतुकीस रस्ता करण्यासाठी ज्या पद्धतीने भूसंपादन केले जाते, त्याच पद्धतीने भूसंपादन करत वाळवा तालुक्यातील बोरगाव परिसरात निचराप्रणाली प्रकल्प साकारले आहेत. या माध्यमातून शेकडो एकर क्षेत्राला फायदा झाला आहे. निचरा प्रणालीचा वाळवा पॅटर्न कृष्णा कालवा सिंचित विभागात राबविणे गरजेचे आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com