सातारा जिल्ह्यात खासगी कारखाने गाळपात आघाडीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sugar Factory
सातारा जिल्ह्यात खासगी कारखाने गाळपात आघाडीवर

सातारा जिल्ह्यात खासगी कारखाने गाळपात आघाडीवर

सातारा : तोडणी, वाहतूक व्यवस्था विस्कळित असूनही यावर्षीसुद्धा ऊस (sugarcane)गळीत हंगामात खासगी साखर कारखान्यांची(sugar factory) गाळपात आघाडी राहिली आहे. आतापर्यंत खासगी साखर कारखान्यांनी २५ लाख ६६ हजार १३० मेट्रिक टन उसाचे गाळप करून २४ लाख ९० हजार ४५५ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे, तर सहकारी साखर कारखान्यांनी १७ लाख ९४ हजार ९४५ मेट्रिक टन उसाचे गाळप करत १९ लाख ६५ हजार दहा क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सह्याद्री कारखान्याला सर्वाधिक ११.९४ टक्के साखर उतारा मिळाला असून, गाळपात जरंडेश्वर कारखान्याने आघाडी घेतली आहे.

हेही वाचा: मकर संक्रांतीपूर्वी शाळा होणार बंद? 7 दिवसांत वाढले दीड लाख रुग्ण

जिल्ह्यातील १३ साखर कारखाने गाळप करत असून, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व खंडाळा साखर कारखाना बंद आहे. उर्वरित पैकी सात खासगी आणि सहा सहकारी कारखाने सुरू आहेत. यावर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान, हंगामास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत या कारखान्यांनी मिळून ४३ लाख ६१ हजार ०७५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ४४ लाख ५५ हजार ४६५ क्विंटल साखरेची निर्मिती केली असून, एकूण सरासरी १०.२२ टक्के साखर उतारा मिळालेला आहे. यावर्षीच्या हंगामात ऊस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असूनही तोडणी वाहतूक यंत्रणा विस्कळित झालेली आहे. सध्या एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या उसाला तुरा आलेला आहे.

त्यामुळे मिळेल तेवढ्या लवकर ऊस घालण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. खासगी कारखान्यांनी गाळपात आघाडी घेतली असून, सहकारी साखर कारखान्यांचा साखर उतारा चांगला आहे. सर्वाधिक साखर उतारा सह्याद्री कारखान्यास ११.९४ टक्के, त्यापाठोपाठ रयत अथणी शुगरला ११.४९ टक्के, तर अजिंक्यतारा कारखान्यास ११.१४ टक्के मिळालेला आहे. त्यामुळे जादा उतारा मिळणाऱ्या कारखान्यांना ऊस घालण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे, तसेच एफआरपी ज्या कारखान्याची जास्त आहे, त्याकडे ऊस पाठविला जात आहे. गाळपात जरंडेश्वर कारखान्याने आघाडी घेत तब्बल सात लाख सात हजार ६० मेट्रिक टन उसाचे गाळप करत सात लाख ६० हजार १०० क्विंटल साखरेची निर्मिती केली असून, त्यांना १०.७५ टक्के साखर उतारा मिळाला आहे.

हेही वाचा: शिक्षण विभागाला उपसभापतींचा घरचा आहेर; कामकाजावर जोरदार ताशेरे

कारखानानिहाय ऊस गाळप व साखरनिर्मिती

 1. आतापर्यंतचे ऊस गाळप व साखर निर्मिती कारखानानिहाय अशी आहे.

 2. सहकारी कारखाने : श्रीराम जवाहर कारखाना १,५७,६०५ (१,७२,४००),

 3. कृष्णा कारखाना ५,२१,९६०(५,०५,६८०),

 4. बाळासाहेब देसाई कारखाना १,०१,२७० (१,१०,१५०),

 5. सह्याद्री कारखाना ४,८५,४०० (५,७९,५४०),

 6. अजिंक्यतारा कारखाना २,९३,४७० (३,२७,०५०),

 7. रयत अथणी शुगर २,३५,२४० (२,७०,१९०).

हेही वाचा: कुडाळ : प्रचाराहून परतताना भाजपचे उमेदवार सुधीर चव्हाण यांचे निधन

खासगी कारखाने

 1. दत्त इंडिया साखरवाडी १,४२,६८४ (१,१०,४००),

 2. जरंडेश्वर कारखाना ७,०७,०६० (७,६०,१००),

 3. जयवंत शुगर ३,२९,५३५ (३,१९,८००),

 4. ग्रीन पॉवर शुगर २,६३,४१० (२,३९,५००),

 5. स्वराज्य इंडिया ३,४४,९१५(२,७७,२२५),

 6. शरयू ॲग्रो ४,३८,४८६ (४,३१,१८०),

 7. खटाव- माण ॲग्रो ३,४०,०४० (३,५२,२५०)

(आकडेवारी : सहकार आयुक्त कार्यालय, पुणे)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SataraSugar Factory
loading image
go to top