सातारा : शंभर बेड रुग्णालयास मिळता मिळेना जागा!

उपमुख्यमंत्र्यांनी सांगूनही जिल्हा प्रशासन ढिम्म
wards of the district hospital
wards of the district hospitalsakal

सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने बघा, असे सांगूनही जिल्हा प्रशासनाला १०० बेडच्या रुग्णालयासाठी जागा पक्की करण्याचा अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांची बेडची परवड थांबणार कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना आरोग्यसेवेचा लाभ मिळावा, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व जिल्हा रुग्णालय अशी यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. त्यातही तज्‍ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपचाराची सुविधा मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक हे प्रामुख्याने जिल्हा रुग्णालयावर अवलंबून असतात.

जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या आंतररुग्ण विभागात २५० बेडची सुविधा आहे. त्यानुसारच वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची पदसंख्या आहे. परंतु, लोकसंख्या वाढीमुळे रुग्णालयातील बेडची संख्या अपुरी पडत आहे. २५० बेडची सुविधा असताना दररोज ३०० ते ३५० रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असतात. त्यामुळे अनेक रुग्णांना जमिनीवर गाद्या अंथरूण उपचार घ्यावे लागत आहेत. जिल्हा रुग्णालयातील सर्वच वॉर्डमध्ये अशी परिस्‍थिती आहे. अगदी प्रसूत झालेल्या महिलांनाही अशा बेडवरच अनेकदा उपचार घ्यावे लागत आहेत. (situation in all the wards of the district hospital)

wards of the district hospital
कोल्हापूरला खंडपीठ स्थापन करा ; श्रीनिवास पाटील

खासगी रुग्णालयातील उपचारांचा खर्च परवडत नसल्यामुळे नाईलाजास्तव रुग्णांना तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत आहे.रुग्णालयाच्या या परिस्‍थितीची जाणीव प्रशासनाला कोरोना संसर्गामुळे झाली. त्यामुळेच संग्रहालयाच्या जागेत रुग्णालय सुरू करावे लागले. परंतु, त्यातूनही प्रशासनाने काही बोध घेतल्याचे दिसत नाही. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी आधीच रुग्णालयात तीन वॉर्ड अतिदक्षता विभागात बदलण्यात आले. उपलब्ध असलेले अन्य वॉर्डही कोरोना रुग्णांसाठी वापरावे लागतात. त्यामुळे अन्य आजारांच्या उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना अत्यंत कमी बेड संख्या उपलब्ध होत आहे. त्यामुळे जमिनीवरील गाद्यांची संख्या आणखी वाढली आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. रुग्णालयांची ही परिस्थिती पाहून त्यांनी १०० बेडच्या रुग्णालयासाठी निधी उपलब्ध आहे. तातडीने जागा पाहा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला केलेल्या होत्या. परंतु, जागा पाहून त्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याचे काम अद्यापही प्रशासनाकडून झाले नाही. त्यामुळे १०० बेडच्या रुग्णालयाला मुहूर्त लागणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.(question is when the 100-bed hospital will have)

wards of the district hospital
इंदापूर पोलिसांनी ३२ लाख ६६ हजार ८० रुपयांचा गुटखा जप्त केला

तातडीने नवीन इमारतीची निर्मिती आवश्यक

साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहे. त्याच्या मंजुरीसाठी जिल्हा रुग्णालयात १०० बेडच्या स्त्री रुग्णालयासाठी तयार करण्यात आलेली इमारत विविध विभागांच्या कार्यालयासाठी महाविद्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे तेथे लवकर रुग्णालय सुरू होण्याची शक्यता नाही. अशा परिस्‍थितीत तातडीने नवीन इमारतीची निर्मिती आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.(Collector and the Health Department must make an effort)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com