Satara Forest: सांगवीत खैराच्‍या शेकडो झाडांची कत्तल; वनविभाग मात्र सुस्त, तोडीचा पंचनामा करण्याची मागणी

Forest department inaction over large scale tree cutting in rural area: सांगवी परिसरात दुर्मीळ खैर वृक्षांची शेकडोंनी कत्तल होऊनही वन विभागाकडून कारवाईचा अभाव; वृक्षप्रेमींकडून तोडीचा सविस्तर पंचनामा व जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी
Sangvi Tree Cutting Row: Locals Demand Panchanama, Forest Officials Under Fire

Sangvi Tree Cutting Row: Locals Demand Panchanama, Forest Officials Under Fire

sakal

Updated on

हुमगाव : जावळी तालुक्यातील कुसुंबी- केळघर या पट्ट्यात दुर्मीळ खैर जातीचे वृक्ष आढळतात. मात्र, या वृक्षांवर कोकणातील व्यापाऱ्यांचा डोळा राहिल्याने दरवर्षी एप्रिल, मे महिन्यांत हजारो दुर्मीळ खैर झाडांची कत्तल तालुक्यात केली जाते. अशीच दुर्मीळ शेकडो खैर झाडांची कत्तल तालुक्यातील सांगवीजवळच्या शिवारात झाली असून, वन विभाग मात्र सुस्त दिसून येत आहे. त्यामुळे सांगवीतील वृक्षतोडीचा रीतसर पंचनामा व्हावा, अशी मागणी वृक्षप्रेमींकडून होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com