हिंम्मत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या

आदित्य ठाकरेंच शंभुराज देसाईंना थेट आव्हान
If you dare resign from MLA Aditya Thackeray challenge to Shambhuraj Desai
If you dare resign from MLA Aditya Thackeray challenge to Shambhuraj Desai

मल्हारपेठ - पाठीत खंजीर खुपसुन शिवसेना फोडण्याचे पाप आणि माणुसकीसोबत गद्दरी करणाऱ्यांना धडा शिकवण्याची, त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. थोडी जरी हिंम्मत असेल तर आमदारकीचा राजीनामा देवुन निवडणुक लढवुन निवडुण येवुन दाखवा, असे थेट आव्हाण युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निष्ठा य़ात्रेदरम्यान माजी मंत्री आमदार शंभुराज देसाई यांना त्यांचे नाव न घेता दिले.

येथील ग्रामपंचायतसमोरील प्रांगणात निष्ठा यात्रेत ते बोलत होते. खासदार विनायक राऊत, माजी आमदार दगडुदादा सपकाळ, शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर, माजी आमदार सदाशिव सपकाळ, शिवसेना उपनेते नितिन बानुगडे-पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख हर्षद कदम, यशवंत घाडगे, उपजिल्हाप्रमुख रविंद्र पाटील, तालुका प्रमुख सुरेश पाटील आदींसह शिवसैनीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उठाव किवा बंड करायला ताकद लागते. मात्र अडीच वर्ष मजामस्ती करुन स्वार्थापोठी गद्दारी करणारे गुवाहाटीत जाऊन मस्ती करत होते. खरे शिवसैनीक असते तर तेथील पुरपरिस्थीत तेथील जनतेला त्यांनी मदत केली असती, असा टोला लगावन श्री. ठाकरे म्हणाले, ४० आमदारांनी गुवाहाटीत जाऊन काय तमाशा केला हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. ज्या गद्दारांनी कोरोना काळात माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हॉस्पीटलमध्ये असताना त्यांची काळजी घेण्याऐवजी वेळ साधुन गद्दारी करुन शिवसेना फोडण्याचे कटकारस्थान रचले जात होतो. अशा गद्दारांना वेळीच धडा शिकवण्याची वेळ आली आहे. राज्यात घाणेरडे राजकारण सुरु आहे. गेल्या महिनाभरापासुन दोन मंत्र्यांचे जंम्बॊ मंत्रिमंडळ अस्तित्वात आले असुन तिसरा लायकीचा मिळाला नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतीका आहे. अडीच वर्षात ४० गद्दारांची सत्तेची भुक वाढुन त्यांनी ईडीची पिडा मागे लागल्यामुळे शिवसेनेला वेटीस धरले. त्याना आता माफी नाही असाही इशारा त्यांनी दिला.

देसाईंच्या बालेकिल्यात मोठी गर्दी

निष्ठा यात्रेसाठी आमदार आदित्य ठाकरे आज दुपारी दोन वाजता येणार होते. त्यामुळे सकाळपासुन कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र त्यांचा दौरा अडीच तासाहुन अधिक काळ लांबला तरीही सभेच्या ठिकाणी असणारी गर्दी तसुभरही कमी झाली नाही. आमदार शंभुराज देसाई यांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंची झालेली सभेस प्रतिसाद कसा मिळेल अशी सर्वाना शंका होती. मात्र सभेस मोठी गर्दी झाली होती.

घोषणांतुन दिसली युवकांची चीड

निसरे फाटा येथे आमदार ठाकरे यांचे आगमन झाले. तेथुन रॅलीने वाद्यांच्या गजरात त्यांची मल्हारपेठपर्यंत जोरदार शक्तीप्रदर्शन करत रॅली काढण्यात आली. यावेळी युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेच्या आमदारांच्या बंडोखोरीनंतर युवकांत निर्माण झालेली चिढ त्यांच्या घोषणांतुन दिसुन आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com