भुईंज परिसराला व्यसनाधिनतेचा वेढा, युवावर्ग पितोय गांजाचा काढा!

विलास साळुंखे
Thursday, 15 October 2020

गेल्या काही दिवसांपासून भुईंज परिसरात अनेक ठिकाणी गांजा सहज उपलब्ध होत आहे. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने बाहेरगावी शिक्षणानिमित्त गेलेले युवक आता गावातच आहेत. त्यांचे जुने वर्गमित्र एकमेकांना भेटत आहेत. या भेटीत मित्रांमध्ये सध्या गांजा पिण्याच्या पार्ट्या रंगत आहेत. सायंकाळ व रात्रीच्या वेळी युवकांचे जत्थेच्या-जत्थे निर्जनस्थळी आढळून येत आहेत.

भुईंज (जि. सातारा) : परिसरातील युवा वर्गात गांजा पिण्याची संख्या वाढत चालली आहे. गावागावांनजीक निर्जनस्थळे, नदीकाठ, मंदिर परिसर आदी ठिकाणी दिवस व रात्रीच्या वेळी गांजा पिणारांची मोठी गर्दी होत असून गांजा पिणारांमध्ये युवक वर्गाचा जास्त प्रमाणात सहभाग दिसत असल्याने पालकवर्गाची चिंता वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भुईंज परिसरात अनेक ठिकाणी गांजा सहज उपलब्ध होत आहे. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने बाहेरगावी शिक्षणानिमित्त गेलेले युवक आता गावातच आहेत. त्यांचे जुने वर्गमित्र एकमेकांना भेटत आहेत. या भेटीत मित्रांमध्ये सध्या गांजा पिण्याच्या पार्ट्या रंगत आहेत. सायंकाळ व रात्रीच्या वेळी युवकांचे जत्थेच्या-जत्थे निर्जनस्थळी आढळून येत आहेत. गावालगत चिंधवलीरोड, कृष्णनदी पूल व मारुती मंदिर अशा ठिकाणाबरोबरच शेतातील काही पडकी घरे आदी भागात युवक गांजा पिताना आढळून येत आहेत. खरं तर या युवकांकडे गांजा कुठून येतो हा संशोधनाचा विषय आहे. 

गुन्हेगारांवर वचक निर्माण करुन जनतेचा विश्वास जिंका : पृथ्वीराज चव्हाण

काही रेकाॅडवरील व्यक्ती, टपरीधारक हा गांजा उपलब्ध करुन देत असल्याची चर्चा युवकांतून ऐकावयास मिळत आहे. काही जण गांजाच्या गोळ्यासुध्दा विकत असल्याची चर्चा आहे. संबंधित खात्याने अनेकवेळा कारवाई केली. मात्र, मनोरुग्ण असल्याचा फायदा अनेक व्यक्ती घेत आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींच्या आधारे होणारी ही व्यसनाधिता वाढतच आहे. काही ठिकाणी ठराविक वेळेला गांजा पिण्यासाठी रांग लागत आहेत. या रांगा व बसलेली ठिकाणे लोकांच्या वर्दळीपासून फार लांब नसल्याने लोकांच्या ते नजरेत येत आहेत. मात्र, लोकही फक्त चर्चाच करीत असून याबाबत सामाजिक बांधिलकीतून काहीच मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत नाहीत.

पाच जिल्ह्यांच्या एसपींना साताऱ्यात आयजींचा कानमंत्र!

नाकाबंदी करुन गांजा पिणारांची तपासणी केल्यास गांजा पिणारांचे व विकणा-यांचे मोठे रॅकेट उघडकीस येईल. मात्र, तसदी कोण घेणार? यासाठी प्रशासनाने यावर काहीतरी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. परिसरातील युवा गांजा पिण्याच्या आधीन होत चालला असल्याने पालकवर्गात सुद्धा आपला मुलगा कुठे जात येत आहे. त्याचे मित्र कोण व त्याची पार्श्वभूमी याची चौकशी करणे गरजेचे आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal Activities By Youth In Bhuinj Satara News